मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Rajasthan Hindu) राजस्थानच्या उदयपूर येथे २०२१ दरम्यान तत्कालीन काँग्रेस सरकारने मदरशासाठी जमीन दिली होती. हिंदू समाजातील लोक याविरोधात रस्त्यावर उतरले होते. सोमवारी यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून संबंधित जमीन वाटप रद्द करण्याच्या मागणीसाठी बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी हिंदू समुदायाकडून रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले.
हे वाचलंत का? : ईदच्या मिरवणुकीत झळकावले औरंगजेब, दहशतवाद्यांचे पोस्टर्स
मिळालेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये राज्यात काँग्रेसची सत्ता असताना येथील मदरशासाठी सुमारे ४ बिघा १६ बिस्वा जमीन देण्यात आली होती. मात्र तेव्हापासून मदरशाच्या नावावर दिलेली जमीन जलयुक्त भागात असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. हे वाटप रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी हिंदू बांधव मावळीमध्ये जमा होऊ लागले. यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निदर्शनात ग्रामीण भागातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.