रेल्वेरुळावर डिटोनेटर्स ठेवणारा आरोपी गजाआड

    23-Sep-2024
Total Views | 29
 
Indian Railway
 
भोपाळ : मध्य प्रदेशातील बरहानपूर येथे रेल्वेरुळावर तब्बल १० डिटोनेटर्स आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. भारतीय लष्करांचे सैनिक आणि अधिकारी ज्या रेल्वेतून प्रवास करत होते. यावेळी रेल्वे रूळावर धावणाऱ्या रेल्वेचा अपघात करण्याचा कट रचण्यात आला होता. यासाठी डिटोनेटर्स रेल्वे रुळाखाली ठेवण्यात आले होते. याप्रकरणी आता आरोपी साबीरला पोलिसांनी ताब्यात घेतले  असून ही घटना १८ सप्टेंबर रोजी घडली होती.
 
प्रसारमाध्यमानुसार, रेल्वे कर्मचारी साबीरला सोमवारी २३ रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणात नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी, एटीएस आणि आरपीएफने याप्रकरणी चौकशी केली होती.
 
डिटोनेटर रेल्वे रूळावर ठेवल्याने लष्करांविरोधात हा कट असल्याचे बोलले जात आहे. तसेच याप्रकरणात साबीरच्या अटकेची रेल्वे मंत्रालयाने दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित डिटोनेटर हे लष्करांच्या रेल्वेरुळाखाली सापडल्याने या बाबीचे गांभीर्य लक्षात येते.
  
घटनेची थोडक्यात माहिती 
 
ही घटना बरहानपूर नेपानगर भागात १८ सप्टेंबर रोजी सागफाट येथून लष्करी जम्मू काश्मीरहून कर्नाटकाकडे जात होती. यावेळी रेल्वेरुळावर अचानकपणे स्फोट झाला. यावेळी रेल्वे चालक अर्थातच लोको पायलटने रेल्वे थांबवली होती. यामुळे अपघात होण्याची शक्यता टळली होती. ही बाब तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली होती. त्यानंतर यंत्रणांनी याप्रकरणी तपास सुरू केला होता.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121