वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवासस्थान असलेल्या 'व्हाइट हाऊस'च्या सुरक्षेत कमतरता आढळ्याने मंगळवार दि. १३ जुलै रोजी 'व्हाइट हाऊस'ला लॉकडाऊन करावे लागले. कोणात्या तरी व्यक्तीने व्हाइट हाऊसच्या सुरक्षा कुंपणावरून मोबाईल फोन फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. घडलेल्या प्रकाराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खरच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
घडलेल्या प्रकाराबद्दल व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले कि, कोणात्या तरी व्यक्तीने व्हाइट हाऊसच्या सुरक्षा कुंपणावरून फोन फेकला, यानंतर लगेचच व्हाइट हाऊस सुरक्षा व्यवस्थाकांकडून आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना नेमून, लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्येच असून, ते पेनसिल्व्हेनिया दौऱ्याला निघण्याच्या वेळेच्या प्रतीक्षेत होते. तथापि, या घटनेचा कोणताच परिणाम त्यांच्या कार्यक्रमावर न होता ते ठरलेल्या वेळेनुसार पेनसिल्व्हेनियाला रवाना झाले.
व्हाइट हाऊसमध्ये कार्यकारी निवासस्थान सहा मजली असून दोन मजले तळघरात तर उर्वरित चार मजले हे वर आहेत. आलेल्या पाहुण्यांना राहण्यासाठी ब्लेअर हाऊस तर आजुबाजुच्या परीसरात एक्झिक्युटिव्ह रेसिडेन्स, वेस्ट विंग, ईस्ट विंग आणि आयझेनहॉवर एक्झिक्युटिव्ह ऑफिस बिल्डिंग आहे.
व्हाइट हाऊसमध्ये यापूर्वीही अनेकवेळा सुरक्षेचे उल्लंघन झाल्याच्या घटना अलिकडच्या काळात समोर आल्या आहेत. ज्यात गोपनीय माहिती लीक होणे, सायबर हल्ले, सुरक्षेबाबत घुसखोरी होणे या घटनांचा समावेश आहे.