ब्रेकिंग! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न! रुग्णालयात दाखल

    23-Sep-2024
Total Views |
 
Akshay Shinde
 
मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांकडील बंदूकीने त्याने स्वत:वर गोळी झाडली असून त्याची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अक्षय शिंदेला घेऊन पोलिस स्टेशनकडे जात असताना त्याने त्यांच्याकडील बंदूक हिसकावून घेतली आणि स्वत:वर गोळीबार केला. यात एका पोलीस अधिकाऱ्यालासुद्धा गोळी लागल्याची माहिती पुढे आली आहे. तर अक्षय शिंदेलादेखील गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  मविआला मोठा धक्का! कर्जत-जामखेडमधील विश्वासू नेते भाजपमध्ये दाखल
 
दि. १३ ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्याला न्यायालयीन कोठडीतून पोलिस स्टेशनमध्ये नेत असताना त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.