आता नव्या योजनेतून शहरी भागात दूरसंचार सेवा उपलब्ध होणार
02-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : देशात ५जी नेटवर्कचे जाळे विस्तारत असतानाच आता केंद्र सरकारकडून अधिक प्रोत्साहन देण्यात येत आहे. दरम्यान, डिजिटल भारत निधीच्या माध्यमातून आता शहरी भागात दूरसंचार सेवा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर, दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत ही योजना गेल्या आठवड्यात अधिसूचित करण्यात आली आहे.
डिजिटल इंडिया फंड आता अतिरिक्त मापदंडांसह शहरी भागात दूरसंचार सेवांच्या तरतुदीला चालना मिळणार आहे. यांसारख्या योजनांमध्ये दूरसंचार सेवांना माफक दरात उपलब्ध करणे आणि त्यांची सुरक्षा वाढवणे यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ८० हजार कोटी रुपयांच्या डिजिटल इंडिया फंडाच्या विस्ताराची माहिती सरकारकडून अधिकृत निवेदनात देण्यात आली आहे.
दरम्यान, दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत ही योजना गेल्या आठवड्यात अधिसूचित करण्यात आली आहे. तसेच, डिजिटल इंडिया फंड अंतर्गत निधी प्राप्त योजना आणि प्रकल्पांना नियमांमध्ये विहित केलेले एक किंवा अधिक निकष पूर्ण करावे लागतील, असे सरकारने नमूद केले आहे. दूरसंचार सेवांच्या वितरणासाठी आवश्यक असलेल्या मोबाइल आणि ब्रॉडबँड सेवा आणि दूरसंचार उपकरणे, दूरसंचार सुरक्षा वाढवणे, ग्रामीण, दुर्गम आणि शहरी भागात दूरसंचार सेवांची उपलब्धता आणि परवडण्यामध्ये सुधारणा करणे या प्रकल्पांचा करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दि. ३१ मार्च २०२४ रोजी मागील आर्थिक वर्षात सरकारकडे ७९,६३८ कोटी रुपये शिल्लक होते. 'डिजिटल इंडिया फंड' पूर्वी युनिव्हर्सल सर्व्हिसेस ऑब्लिगेशन फंड (युएसओएफ) म्हणून ओळखला जात होता. यामार्फत फक्त ग्रामीण आणि दुर्गम भागात नेटवर्क आणण्यात मदत झाली होती.