विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! रावसाहेब दानवेंवर सोपवली मोठी जबाबदारी

    31-Aug-2024
Total Views |
 
Raosaheb Danve
 
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. यातच आता भाजपनेही आपला मास्टर प्लान तयार केला आहे. यानुसार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर विधानसभा निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
 
 
 
शुक्रवार, दि. ३० ऑगस्ट रोजी कोअर कमिटीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना विधानसभा निवडणूक संयोजकपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर आमदार राम सातपुते यांच्यावर अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश प्रभारीपद सोपवण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला अद्याप परवानगी नाही!
 
विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. येत्या दोन महिन्यात निवडणूका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पक्षात मोठे बदल केल्याचे पाहायला मिळाले. यात रावसाहेब दानवेंवर भाजपच्या महाराष्ट्रातील विजयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.