भाजप आमदार आशीष शेलारांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून कट्टरपंथी युवकाने उकळले पैसे

    26-Aug-2024
Total Views |
 
Ashish Shelar 
 
मुंबई : भाजपचे आमदार आशीष शेलार (Ashish Shelar) यांचा स्वीय सहाय्यक आहे असे फोनद्वारे सांगत वकील आणि एका व्यक्तीला खंडनी मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मुंबई येथे घडली असून आरोपीचे नाव आमीन इरफान बेंद्रेकर आहे. याप्रकरणात वांद्रे पोलिसांनी इरफानला २६ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आशीष शेलार यांचा स्वीय सहाय्यक नवनाथ शेलार यांनी घडलेल्या घटनेसंदर्भात वांद्रे पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आमीन इरफान बेंद्रेकर आशीष शेलार यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवून वकील आणि एका व्यक्तीकडून आठ हजार रूपयांची मागणी केली. आरोपी आमीन इरफान बेंद्रेकर यांनी वकीलाला दूरध्वीनद्वारे संपर्क केला होता. त्याने राज्य सरकारकडून कैद्यांना सोडण्याची योजना आहे. त्यात अशिलाचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या तपशीलाची पडताळणी करणे गरजेची असल्याचे आरोपीने संबंधितांना फोनद्वारे सांगितले. याप्रकरणी वकिलांनी आरोपी आमीन विरोधात तक्रार दाखल करत असे अनेक वकिलांसोबत कृत्य केले असल्याचे सांगितले.
 
 
 
याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला नालासोपारा येथून अटक करण्यात आली आहे. तुरूंगात झालेल्या मारहाणीत किंवा जागेच्या अभावामुळे संबंधित गुन्हेगार जखमी झाल्याचे सांगून त्याच्या कुटुंबियांकडून पैसे उकळल्याचे काम केले जात होते, असे वांद्रे पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
 
तसेच एका गुन्हेगाराकडून बेंद्रेकरने आठ हजार रूपये घेतले होते. ही माहिती एका वकीलास समजली. त्या वकिलाने ही माहिती आशीष शेलार यांचे स्वीय सहाय्यक नवनाथ सातपुते यांना दिली होती.