मुंबईकर भारतीय संघाच्या स्वागतासाठी सज्ज; पंतप्रधान मोदींनी घेतली चॅम्पियन खेळाडूंची भेट

    04-Jul-2024
Total Views |
 modi with team india
 
नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक विजेता भारतीय संघ गुरुवार, दि. ४ जुलै २०२४ दिल्लीत पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचली आहे. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर चॅम्पियन खेळाडूंनी पंतप्रधान निवासस्थानावरून दिल्ली एअरपोर्टकडे निघाला आहे. दिल्लीवरून भारतीय संघ मुंबईकडे रवाना होईल.
 
दिल्लीतील जनता आपल्या जगज्जेत्या नायकांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा थांबली आहे. पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान भारतीय संघाने खास जर्सी घातली होती. जर्सीच्या समोर ठळक अक्षरात 'चॅम्पियन्स' लिहिले होते. भारतीय खेळाडू विमानतळावर उतरताच चाहत्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर भारतीय संघ मुंबईकडे रवाना झाला आहे. भारतीय संघ ४ वाजता मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
  
भारतीय संघाच्या विश्वविजेत्या खेळाडूंच्या स्वागतासाठी मुंबईत विजयी परेड आयोजित करण्यात आली आहे. संध्याकाळी ५:०० वाजल्यापासून मुंबईच्या मरीन ड्राइव्ह आणि प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन-टॉप बसने प्रवास करेल. यावेळी मुंबईकर आपल्या नायकांचे स्वागत करू शकतील.