मिटकरींची गाडी फोडल्याप्रकरणी १३ मनसैनिकांवर गुन्हा दाखल! दोघांना अटक

    31-Jul-2024
Total Views |
 
MNS
 
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना अटक केली आहे. मंगळवारी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली होती.
 
अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्ते आमनेसामने आले होते. या घटनेनंतर मनसेच्या १३ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर पंकज साबळे आणि सौरभ भगत या दोघांना अटक करण्यात आली होती.
 
हे वाचलंत का? -  इम्तियाज जलील यांच्या घरी विविध पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी! चर्चांना उधाण
 
दरम्यान, या दोघांची प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तोडफोड प्रकरणात मनसेचे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे हे मुख्य सुत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे.
 
तोडफोड राड्यात एकाचा मृत्यू!
 
या राड्यामध्ये मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. तोडफोड राड्यानंतर जय मालोकर यांच्या छातीत दुखत असून त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.