पवारांना जमिनी लुटण्याचा छंद!

गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    10-Jul-2024
Total Views |
 
Rohit Pawar
 
मुंबई : पवारांना जमिनी लुटण्याचा छंद असून त्यांनी एका व्यक्तीची जमीन लुटून त्यांची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी रोहित पवारांवर केला आहे. गोपीचंद पडळकरांकडे एका व्यक्तीने आपल्या फसवणूकीची कैफियत सांगितली. त्यानंतर पडळकरांनी ही घटना माध्यमांसमोर मांडली.
 
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "कृष्णा जायबाय हे मुंबई हायकोर्टात वकील आहेत. ते माझ्याकडे आले होते. रोहित पवारांनी त्यांची मोठी फसवणूक केली आहे. पवारांना जमिनी लुटण्याचा पहिल्यापासूनचा छंद आहे, हे संपुर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कृष्णा जायबाय हे कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील रहिवासी आहेत. २० ऑक्टोबर २०२१ ला रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात घर बांधण्यासाठी भांडेवाडी गावातील त्यांची २ एकर जमीन खरेदी केली. पण त्यांना एकही रुपया दिलेला नाही."
 
हे वाचलंत का? -  विधानसभेचं कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब!
 
"रोहित पवारांनी ५ एकर जमिनीपैकी २ एकर जमीन ५२ लाख रुपयांना खरेदी केली. त्यांनी या रकमेचा चेक दिला पण दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती बँकेत गेली असता त्यांचा चेक बाऊन्स झाला. त्यानंतर त्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला पण त्यांना टोलवाटोलवी केली आणि २०२३ ला ती जमीन अडीच कोटी रुपयाला दुसऱ्याला विकली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या खात्यात ५२ लाख रुपये पाठवण्यात आले. यात काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टातदेखील त्यांच्यासोबत दगाफटका झाल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे रोहित पवारांचा मूळ डीएनए फसवणूकीचा आणि भ्रष्टाचाराचा असल्याचं सिद्ध झालं आहे," असे पडळकर म्हणाले.