मोदींचे ऑस्ट्रियामध्ये जंगी स्वागत; 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

    10-Jul-2024
Total Views |
 Modi-in-Austria
 
व्हिएन्ना : दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार, दि. ९ जुलै २०२४ ऑस्ट्रियाला पोहोचले. तेथे ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शेलेनबर्ग यांनी पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत केले. ट्विटरवरील एका पोस्टमध्ये, ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी ट्विट केले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे व्हिएन्नामध्ये स्वागत आहे. ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करणे ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे मित्र आणि भागीदार आहेत. मी तुमच्या भेटीसाठी उत्सुक आहे."
 
पंतप्रधान मोदी मंगळवारी ऑस्ट्रियाला पोहोचले. या भेटीदरम्यान, दोन्ही देश त्यांचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करतील आणि अनेक भौगोलिक राजकीय आव्हानांवर घनिष्ठ सहकार्याच्या मार्गांवर चर्चा करतील. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमधील संबंध अधिक सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्यावरही चर्चा करतील. पंतप्रधान मोदी आपल्या ऑस्ट्रिया दौऱ्यात प्रवसी भारतीयांची देखील भेट घेणार आहेत.
  
त्याआधी ऑस्ट्रियाच्या सरकारने मोदींचे भव्य स्वागत केले. ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी मोदींसोबत सेल्फी काढली. त्यासोबतचं त्यांच्या स्वागतासाठी प्रवासी भारतीय देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदींच्या स्वागतावेळी ऑस्ट्रियातील कलाकारांनी वंदे मातरम् या गीताचे सादरीकरण केले.