एमएसएमई व स्टार्टअप उद्योगासाठी सरकारचे मोठे पाऊल

सर्व्हेतून त्यांचे प्रश्न सोडवण्यात येणार

    08-Jun-2024
Total Views |

MSME 2
 
 
मुंबई:एमएसएमई (सूक्ष्म,लघू,मध्यम)उद्योग व स्टार्टअप कंपन्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. आता टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलंस इंडिया (TCoE)कडून या उद्योगांना पाठिंबा देत त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.तंत्रज्ञानात आव्हाने, गरजा ओळखून या कंपन्यांना मार्गदर्शन करण्याचे टीसीओई या डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) अंतर्गत येणाऱ्या विभागाने ठरवले आहे.
 
या विभागाने तंत्रज्ञानाची व त्याची अंमलबजावणीची गरज ओळखून या कंपन्यांना सहकार्य करणार आहे. यासाठी या कंपन्यांना सरकारी विभागाकडून सर्व्ह करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. तो पार पाडण्यासाठी हे पाऊल टीसीओईने टाकले आहे. एमएसएमई ( MSME) मधील तंत्रज्ञान विभागातील आव्हाने, काळाच्या गरजा ओळखत काळाच्या ओघात त्यांना स्पर्धात्मक करण्यासाठी सरकारी विभाग पुढाकार घेणार आहे.
 
इंडस्ट्री ४.० बेसलाईन सर्व्ह अमंग एमएसएमई (Industry 4.0 Baseline Among MSME) या शीर्षकाखाली या सर्व्हैचे अनावरण करण्यात येईल. ५ जी सेवेच्या माध्यमातून डिजिटल क्रांतीसाठी, तसेच डिजिटल ट्रान्सफॉरमेशन करण्यासाठी हा पुढाकार घेतला जाणार आहे. ५ जी तंत्रज्ञानाच्या युगात टेलिकॉम क्षेत्रातील आधुनिकतेचा वापर करुन एमएसएमई क्षेत्र मजबूत करण्यासाठी सरकारी विभाग अहवाल सादर करणार आहे.
 
'५ जी, ६ जी तंत्रज्ञानाचा वापर करून यांचा क्षमतांचे भांडवल करण्यास मजबूत इकोसिस्टीम पाया उभा करणे हे सर्वेक्षणाचे उदिष्ट आहे विशेषतः कमीत कमी १० क्षेत्रीय इंडस्ट्रीजमधील विशेष गरजा ओळखत त्यांना अत्याधुनिक व्यासपीठावर चालता यावे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे स्पर्धात्मक बनवणे हे उद्दिष्ट असावे.' असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे.
 
५ जी, ६ जी तंत्रज्ञानाचा वापर करत सिमलेस सेन्सर्सचा वापर करून एकत्रितपणे सायबर सिस्टीमचा मार्ग मोकळा होईल व सगळ्या क्षेत्रात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे शाश्वत वाढ होणार आहे. प्रसारमाध्यमांनी म्हटल्याप्रमाणे, ९० दिवसांच्या कालावधीत या सर्व्हेची आखणी, डेटा कलेक्शन, सर्व्हेची आखणी, बांधणी, व मिळालेल्या डेटाचे विश्लेषण व सुचवलेले उपाय या सगळ्याचे नियोजन या कालावधीत होणार आहे.
 
यामध्ये एमएसएमईला चालना मिळाल्याने या क्षेत्रातील कामगिरी व्यापक पद्धतीने वाढू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या तंत्रज्ञान विकासामुळे उत्पादनातील खर्च कमी होत आधुनिकता वाढू शकते तसेच जनजागृती निर्माण होऊन अनेक उद्योजकांना सक्षम करता येईल.