शेअर बाजार विश्लेषण: आठवड्याच्या अखेरीस बाजारात मोदीलाट ! तिसऱ्यांदा रॅली सेन्सेक्स १६१८.८५ अंशाने वाढला

बँक निर्देशांकात वाढ व आयटी व रिअल्टी समभागात वाढ

    07-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी लाट आली आहे. सेन्सेक्स निर्देशांक तब्बल १६१८.८५ अंशाने वाढत ७६६९३.३६ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४६८.७५ अंशाने वाढत २३२९०.१५ पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे २.१६ व २.०५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांक ६०९.५४ अंशाने वाढत ५६७६६. ६९ पातळीवर पोहोचला आहे.निफ्टी बँक निर्देशांक ५११.३० अंशाने वाढत ४९८०३.२० पातळीवर पोहोचला आहे. बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.२५ व २.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.४९ व २.२९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सगळ्याच समभागात वाढ झाली आहे.सर्वाधिक वाढ आयटी (३.३७%),रिअल्टी (२.८%), ऑटो (२.५६%), मेटल (२.०९%) पीएसयु बँक (१.२३%), मिडिया (१.४६%) समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत एकूण ३९५२ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २८९४ समभाग वधारले असून ९६७ समभाग आज घसरले आहेत. त्यातील १९० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ३५ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. ३५३ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १६६ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.आज एनएसईत एकूण २७५० समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २१६९ समभाग वधारले असून ४८९ समभागात घसरण झाली आहे. १२२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २० समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १७९ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३५ समभाग लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४२३.४१ कोटी होते तर एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल ४२०.१४ लाख कोटी होते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरण होत ८३.५० रुपये डॉलर पातळीवर स्थिरावली आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. अनेक आर्थिक कारणांमुळे ही आज दरवाढ झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनिश्चितता, युएस मधील असमाधानकारक रोजगार निर्मितीची आकडेवारी, युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची चर्चा, वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे सोने महाग झाले होते. युएस गोल्ड स्पॉट दरात संध्या काळपर्यंत १.६७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात १.५४ टक्क्यांनी संध्याकाळपर्यंत घसरण झा ली होती.भारतातील एमसीएक्स निर्देशांकात सोन्याच्या निर्देशांकात १.४२ टक्क्यांनी घसरण होत सोने ७२०९६.०० पातळीवर पोहोचले आहे.'गुड रिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ३०० ते ३३० रुपयांनी वाढ झाली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील कच्च्या (Crude) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. युएस रोजगार निर्मितीची म्हणजेच युएस पेरोल आकडेवारी, तसेच फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का ही चिंता तसेच ओपेक राष्ट्रांनी तेल उत्पादनात कपात करण्या चा निर्णय घेतल्यामुळे दरात वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत क्रूड म्हणजेच कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात ०.४० टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent निर्देशांकात ०.३८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
भारतातील एमसीएक्स (MCX) कच्च्या तेलाच्या निर्देशांकात ०.११ टक्क्यांनी वाढत ६३३३.०० रुपये प्रति बॅरेल किंमतीवर कच्चे तेल पोहोचले आहे.आज शेअर बाजारात रॅलीच शेवटपर्यंत कायम राहिली आहे. बाजारातील सगळ्या स्तरावरील समभागात (Stock) मध्ये वाढ झाल्याने बाजारात ही पातळी अखेरच्या सत्रापर्यंत कायम राहिली होती. मिडकॅप, स्मॉलकॅप, लार्जकॅप तिन्ही समभागात चांगली वाढ झाली. बँक निर्देशांकातही वाढ कायम राहिली.
 
दुसरीकडे एनडीए प्रणित मोदी सरकार लवकरच शपथ घेण्याची शक्यता असल्याने बाजारात पुन्हा आत्मविश्वास बळावलेला दि सत आहे. आर्थिक धोरणे कशी असतील याविषयी सुरूवातील चिंता राहिली असली तरी हळूहळू मोदी सरकार आधीची आर्थिक धोरणे पुढे चालू ठेवतील ही भावना निर्माण झाल्याचे बाजारात दिसून आले. बाजारातील ही सलग तिसऱ्यांदा वाढ झाली असून बा जारातील भारतीय अर्थव्यवस्थेबाबत निश्चिततेचे प्रतिबिंब दिसत आहे
 
दुसरीकडे आज आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी पतधोरण समितीचा निर्णय जाहीर केला ज्यामध्ये आठव्यांदा रेपो दर आरबीआयने स्थिर ठेवल्याने अर्थव्यवस्थेत गती व सुधारणा होण्याची दाट शक्यता आहे. महागाई देखील नियंत्रणात असल्याने व ग्राहक किंमत निर्देशांक हा ११ महिने स्थिर राहिल्याने बाजारात स्थिरता येण्याची शक्यता आहे. गव्हर्नर दास यांनी आगामी का ळात जीडीपी दर ७.८ टक्क्यांपर्यंत राहू शकते असा अंदाज व्यक्त केल्याने खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील उत्पादनात देखील वाढ होऊ शकते असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे बाजारातील वित्तीय तूट भरून काढण्यासाठी आरबीआय ने यशस्वीपणे प्रयत्न सुरू केल्याने व Withdrawal of Accomodation ची अंमलबजावणी केल्याने अर्थव्यवस्थेला झळाळी येऊ शकते.
 
आज बीएसईत एम अँड एम, विप्रो, टेक महिंद्रा, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, टाटा मोटर्स,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, एचसीएलटेक, रिलायन्स, सनफार्मा, टीसीएस, एसबीआय, एक्सिस बँक, नेस्ले, कोटक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयटीसी या समभागात वाढ झाली आहे तर जेबीएम ऑटो, फिनोलेक्स केबल्स, लिंडे इंडिया, वी गार्ड, प्रेसटिज इस्टेट, लक्ष्मी मशीन, ग्लेनमार्क , त्रिवेणी टर्बाईन, पेज इंडस्ट्रीज, मेट्रोपोलीस, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, ओबेरॉय रियल्टी, मेट्रो ब्रँडस, आरती इंडस्ट्रीज, जुबलिएट फूड,हुडको या समभागात घसरण झाली आहे.
 
आज एनएसईत एम अँड एम, विप्रो, टेक महिंद्रा, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, बजाज फायनान्स, टायटन कंपनी, टाटा मोटर्स, एनटीपीसी, डॉ रेड्डीज, बजाज फायनान्स, रिलायन्स, सनफार्मा, ग्रासिम, अदानी पोर्टस, टीसीएस, एसबीआय, एचडीएफसी लाईफ, सिप्ला, एक्सिस बँक, कोटक महिंद्रा, मारूती सुझुकी, श्रीराम फायनान्स, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल,हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक, ब्रिटानिया, हिंदाल्को, बजाज ऑटो या समभागात वाढ झाली आहे तर नुकसान एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्टमध्ये झाले आहे.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना , असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च निरज शर्मा म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकांनी जोरदार रॅली पाहिली, निफ्टीने साप्ताहिक आधारावर २३२९० वर सार्वकालिक उच्चांक नोंदवला. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक स्केलवर, निर्देशांकाने हँगिंग मॅन कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. वरच्या बाजूस, तात्काळ प्रतिकार निर्देशांक २३३४० पातळीच्या जवळ ठेवला गेला तर निर्देशांक २३५००-२३८०० पातळीपर्यंत वाढू शकतो. सरासरी (DEMA) सपोर्ट दिला जातो.
 
बँक निफ्टी निर्देशांक सकारात्मक नोटेवर उघडला आणि दिवसभरात ४९,८०३ स्तरांवर सकारात्मक नोटवर स्थिरावत मजबूत मजबूती कायम ठेवली. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक स्केलवर, निर्देशांकाने हँगिंग मॅन कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे. वरच्या बाजूस, निर्देशांकासाठी तात्काळ प्रतिकार ५०००० पातळीच्या जवळ ठेवला जातो, त्यानंतर ५११३३ स्तरांवर, जेथे मागील उच्च ठेवला जातो. नकारात्मक बाजूने, बँक निफ्टीसाठी शॉर्ट सपोर्ट ४८५०० पातळीच्या जवळ आहे जेथे ३४- DEMA सपोर्ट ठेवलेला आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे हेड ऑफ रिसर्च सिद्धार्थ भामरे म्हणाले, ' स्थानिक हवामान आणि खेळपट्टी महागाईचा सामना करण्यासाठी अधिक कोपराची जागा देते म्हणून RBI 6.5% च्या रेपो दरावर फलंदाजी करत आहे.आरबीआयने FY25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज ७.०% वरून ७% वर सुधारित केला आहे तर महागाईचा अंदाज ४.५% वर अपरिवर्तित राहिला आहे. चलनवाढीच्या आघाडीवर गव्हर्नर म्हणाले की इंधनातील निर्मुलन सहाय्यक आहे परंतु अन्न महागाई थोडी अस्थिर राहील. खाजगी उपभोगातील वाढ, निरोगी सरकारी आणि कॉर्पोरेट ताळेबंद आणि बँकिंग व्यवस्थेतील सुधारित मालमत्तेची गुणवत्ता वाढ सकारात्मक आहे. वरील सामान्य मान्सूनचा अंदाज जो खरीप उत्पादनाला चालना देईल आणि बफर स्टॉकमध्ये वाढ करेल अन्न महागाई नियंत्रणात ठेवू शकेल.
 
या चलनविषयक धोरणातून आमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'फेडचे अनुसरण करा' या आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वाशी संबंधित गव्हर्नरचे विधान. त्यांनी नमूद केले की आरबीआयच्या कृती प्रामुख्याने देशांतर्गत वाढ-महागाईच्या दृष्टीकोनातून निर्धारित केल्या जातील. तर, जीडीपी वाढ वरच्या दिशेने सुधारली आहे आणि महागाई नियंत्रणात आहे, फेडने नजीकच्या भविष्यात त्याचे दर कमी केले तरी व्याजदर कमी करण्याची गरज आहे का? किंवा फेडने थांबा आणि पाहा खेळ खेळला तरीही आम्ही व्याजदर कमी करू नये आणि आमची वाढ वाढवू नये? कोणत्याही परिस्थितीत, आपली अर्थव्यवस्था शाश्वत आर्थिक वाढीसाठी मजबूत पायावर आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना, बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने FY25 साठी भारताचा वास्तविक जीडीपी (GDP) अंदाज 7% वरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी सकारात्मक पातळीवर बंद झाले आणि २% च्या वर वाढले. मान्सूनचा सकारात्मक अंदाज आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात मागणीच्या चांगल्या परिस्थितीची शक्यता हे या आत्मविश्वासाचे मुख्य चालक आहेत. .एमपीसीने धोरण दर ६.५ टक्के राखण्याचे देखील निवडले कारण FY24 साठी जीडीपी वृद्धी ८.२ टक्क्यांपेक्षा जास्त होती
 
किरकोळ महागाई एप्रिल २०२४ मध्ये ११ महिन्यांच्या नीचांकी ४.८३ टक्क्यांवर पोहोचली आहे, जिथे ते ४ टक्के लक्ष्य ठेवत आहेत. यूएस साप्ताहिक बेरोजगार दाव्यांच्या अहवालानंतर गुंतवणूकदारांना बाजाराची अधिक स्पष्टता मिळेल, जे आज देय आहे.यूएस कम्युनिकेशन सेवा प्रदात्यांपैकी एकाने विप्रोला ५०० दशलक्ष. डॉलर करार दिला आहे. विप्रो काही उत्पादनांसाठी उद्योग-विशिष्ट उपाय आणि व्यवस्थापित सेवा ऑफर करेल. हा आदेश पाच वर्षांच्या कालावधीत लागू केला जाईल.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीजचे हेड ऑफ इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, 'तेलाच्या किमती शुक्रवारी कमी झाल्या, पूर्वीच्या नफ्याला सरेंडर केले. OPEC+ चे नेते सौदी अरेबिया आणि रशिया यांच्याकडून आउटपुट करार समायोजित करण्याच्या तयारीबद्दलच्या आश्वासनामुळे बाजारात सुरुवातीला थोडी तेजी दिसून आली. काल, युरोपियन सेंट्रल बँकेने २०१९ नंतर प्रथमच त्यांचे व्याजदर २५ आधार अंकांनी कमी केले.आजच्या सुरुवातीला आरबीआय एमपीसी बैठकीत, चलनवाढीवर सतत लक्ष केंद्रित करून, अपेक्षेप्रमाणे बेंचमार्क व्याजदर अपरिवर्तित ठेवला गेला. यूएस बेरोजगार दाव्यांचा डेटा २२९,००० वर आला, जो अपेक्षित २२०,००० पेक्षा थोडा जास्त आहे. आज नंतर, फेडरल रिझर्व्हच्या कृतींबद्दल पुढील अंतर्दृष्टीसाठी गुंतवणूकदार यूएस नॉन-फार्म पेरोल्स आणि बेरोजगारी दर डेटावर लक्ष केंद्रित करतील.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेड एसव्हीपी रिसर्च अजित मिश्रा म्हणाले, ' चालू असलेल्या सकारात्मक ट्रेंडच्या अनुषंगाने बाजाराने सलग तिसऱ्या सत्रात २% ने वाढ केली. सपाट सुरुवात झाल्यानंतर, निफ्टी हळूहळू चढता आला आणि त्याच्या विक्रमी उच्चांकाच्या जवळ गेला. आयटी, ऑटो आणि एनर्जीने नफ्यात अग्रस्थानी राहून बहुतेक क्षेत्रांनी वाढीस हातभार लावला. विस्तृत निर्देशांक देखील या प्रवृत्तीशी संरेखित झाले, १.४% ते २.३ % वाढले.'
 
बाजारांनी त्यांचा विक्रमी उच्चांक जवळपास परत मिळवला आहे आणि ही गती कायम ठेवण्यास तयार असल्याचे दिसते. IT आणि FMCG सह प्रमुख क्षेत्रांमध्ये फिरती खरेदी, जे पूर्वी बाजूला होते, वरच्या हालचालीला चालना मिळाली. म्हणून, जोपर्यंत निफ्टी २२६०० पातळीच्या वर आहे तोपर्यंत "बाय ऑन डिप्स" धोरण राखण्याची आम्ही शिफारस करतो.: