"निष्पाप प्राण्याला का मारता? मला मारा मी इथेच आहे" - के. अण्णामलाई यांचे स्टॅलिनच्या द्रमुकला आव्हान

    07-Jun-2024
Total Views |
 annamalai
 
चेन्नई : द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी एका बकऱ्याच्या गळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांचे चित्र बांधून त्याचा भर रस्त्यात गळा कापला होता. प्रतिकात्मक शिरच्छेदावर भाजप नेत्याने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दि. ४ जून रोजी, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, या घटनेबद्दल विचारले असता, अण्णामलाई यांनी द्रमुक कार्यकर्त्यांना निरपराध बकऱ्याची हत्या करू नका, त्याऐवजी ते कोईम्बतूरमध्ये त्यांच्या कडे येऊ शकतात असे सांगितले.
 
“एखाद्या निरपराध शेळीला मारण्याऐवजी, द्रमुकला राग आला असेल तर माझ्याकडे या, मी इथेच आहे...” दरम्यान, तामिळनाडू भाजपचे उपाध्यक्ष नारायणन तिरुपती यांनी अण्णामलाई यांची खिल्ली उडवण्यासाठी द्रमुक कार्यकर्त्यांनी कॅमेऱ्यात सार्वजनिक रस्त्यावर केलेल्या बकऱ्याच्या शिरच्छेदाचा तीव्र निषेध केला.
 
ते म्हणाले की, “त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचे प्रदर्शन करण्याचा हा एक क्रूर आणि अहंकारी मार्ग आहे. याचा मी तीव्र निषेध करतो. भ्रष्टाचार आणि कुशासनाला विरोध करण्यापासून ते थांबणार नाही. अन्नामलाई तामिळनाडूतील भ्रष्ट लोकांविरुद्ध आवाज उठवत आहेत. ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना रस्त्याच्या मधोमध झालेल्या हिंसाचाराची शिक्षा झालीच पाहिजे. आत्तापर्यंत सरकारने कारवाई करायला हवी होती. अन्नमलाईचे संरक्षण करणे हे तामिळनाडू पोलिसांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे." असं मत नारायणन तिरुपती यांनी व्यक्त केली.