उपमुख्यमंत्री बदलणार का? गिरीश महाजन यांच्याकडून खुलासा!

    07-Jun-2024
Total Views |
Girish Mahajan news

मुंबई :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मुक्त करण्याचे विधान दि. ६ जून रोजी पत्रकार परिषदेत केले. ज्यानंतर सर्वत्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित होऊ लागल्या. त्यात काही वृत्तस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने गिरीश महाजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होतील, अशा बातम्या प्रसिद्ध करायला सुरुवात केली. पण आता गिरीश महाजनांनी याबद्दल पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे.
 
गिरीश महाजन म्हणाले की, मी उपमुख्यमंत्री होणार, अशा बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही. उपमुख्यमंत्री कोण होणार, गृह खातं कुणाला मिळणार, कोणतं खातं कुणाला मिळणार? यामध्ये कुठलंही तथ्य नाही. ही बातमी निराधार आहे, असे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस आज अमित शाह यांना दिल्लीत भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण आम्ही याबाबत पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत. पंतप्रधानांच्या शपथविधीवेळी जाऊ तेव्हा पक्षश्रेष्ठींचा वेळ घेऊ. आणि याबद्दल जाणून घेऊ, असे ही महाजन म्हणाले.