"लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे आधुनिक शकुनी!"

चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

    06-Jun-2024
Total Views |
 
Sanjay Raut
 
मुंबई : तुम्ही लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे आधुनिक शकुनी शोभता, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर केला आहे. संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
 
 
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "सर्वज्ञानी संजय राऊत, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’सारखं दुसऱ्याच्या वरातीत नाचण्यात तुमचा हातखंडा आहे. देवेंद्रजींच्या रेकॅार्डची चिंता तुम्ही करू नका. अडथळ्यांवर मात करून पुढं जाण्याचं त्यांचं रेकॅार्ड आहे. तुमचं रेकॅार्ड रसातळाला गेलं ते पाहा," असा टोला त्यांनी लगावला.
 
हे वाचलंत का? -  यश-अपयश ही सामूहिक जबाबदारी, आम्ही पराभवाने खचून जाणारे नाहीत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
त्या पुढे म्हणाल्या की, "भाजपची साथ सोडून स्वत:च्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतलीत आणि निम्म्यावर घसरलात. पण तरीही लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे तुम्ही आधुनिक शकुनी शोभता खरे," असा घणाघात चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केला आहे.