जय हो...! मराठी अभिनेत्याने केलं भाजपचं अभिनंदन, शेअर केला मोदींचा 'तो' फोटो

    05-Jun-2024
Total Views |
 
 
pm modi
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीसाठी ४ जून २०२४ हा दिवस फार महत्वाचा होता. निकाल काय लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीच्या या निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या यशानंतर मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेता अभिजित केळकर याने मोदींचे अभिनंदन केले आहे.
 
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान मोंदीचा फोटो शेअर करत अभिजीतने आनंद व्यक्त केला आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोला कॅपश्न देत लिहिले आहे की, "जय हो!".
 

pm modi 
 
अभिजीत केळकरने काही महिन्यांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश करत आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या प्रचार रॅलीतही तो सहभागी झाला होता.