अयोध्येतील लोकांवर अनुपम खेरही भडकले; म्हणाले, "प्रामाणिक व्यक्तीलाच..."

    05-Jun-2024
Total Views |
 
anupam kher
 
 
मुंबई : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला. ज्या दिवसाकडे देशातील नागरिकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते तो ४ जूनचा दिवस नक्कीच सर्वांच्या लक्षात राहणारा होता. दरम्यान, अयोध्येत अनपेक्षित अपयश मिळाल्यामुळे सरकारसह काही कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मिडिया पोस्ट करत, “सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात”, असे म्हटले आहे.
 
अनुपम खेर लिहितात, "कधी कधी विचार करतो की, प्रामाणिक व्यक्तीने अती जास्त प्रामाणिक राहू नये. जंगलात सरळ उगवणारे झाडंच सर्वात आधी छाटले जातात. सर्वात जास्त प्रामाणिक व्यक्तीलाच जास्त कष्ट घ्यावे लागतात. पण तरी तो आपला प्रामाणिकपणा सोडत नाही. म्हणूनच तो कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनतो. जय हो!" खेर यांनी या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, 'सच्चाई'.
 

anupam kher 
 
तर गायक सोनू निगमनेही पोस्ट करत अयोध्यावासियांना सुनावले आहे. सोनू निगमने लिहिले आहे की, 'ज्या सरकारने संपूर्ण अयोध्या उजळून टाकली, नवे विमानतळ बांधली, देशाला उत्तम रेल्वे स्टेशन दिले, ५०० वर्षांनंतर राम मंदिर बांधले. त्या पक्षाने संपूर्ण मंदिर अर्थव्यवस्था निर्माण केली आहे आणि अयोध्येतील लोकसभेच्या जागेसाठी त्यांना संघर्ष करावा लागला , अयोध्यावासीयांना हे लज्जास्पद आहे”.