शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात धुव्वा उडाला सेन्सेक्स ४३८९.३९ अंशाने घसरला निफ्टी १३७९.४० अंशाने घसरण

मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण! बँक निर्देशांकातही धुव्वा उडाला

    04-Jun-2024
Total Views |

Stock Market

 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात 'प्रचंड' घसरण झाली आहे. आज भारतीय जनता पार्टीचा विजयापेक्षा विरोधी पक्षांच्या काटे की टक्करची अधिक चर्चा सकाळपासूनच सुरू असल्याने शेअर बाजारात मोठा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे.परि णामी बाजारात मोठी घसरण झाली आहे. बीएसई सेन्सेक्स ४३८९.३९ अंशाने (५.७४%) टक्क्यांनी घसरण होत ७२०७९.०५ पातळीवर पोहोचला आहे. एनएसईत १३७९.४० अंशाने घसरण होत (५.९३%) २१८८४.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ८.०७ व ६.७९ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ७.८४ व ७.१५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ४७१३.३९ अंशाने वाढत ५३५७७.०८ (८.०९%) पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांकात ४०५१.३५ अंशाने घसरण होत (७.९५%) ४६९२८.६० पातळीवर पोहोचला आहे.
 
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये केवळ एफएमसीजी (०.९५%) समभागात वाढ झाली असून बाकी सर्व समभागात घसरण झाली आहे. पीएसयु बँक (१५.१४%) समभागात घसरण झाली आहे तर प्रायव्हेट बँक (७.०४%), मेटल (१०.६३%), तेल गॅस (११.८०%), रिअल्टी (९.६२%) समभागात घसरण झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९३४ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ४८८ समभागात वाढ झाली असून ३३४९ समभागात घसरण झाली आहे. १३९ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर २९२ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. १२ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर २ समभाग लोअर सर्किटवर पोहोचले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७५० समभागात ट्रेडिंग झाले असताना २४२ समभागात वाढ झाली आहे असताना २४३८ समभागात घसरण झाली आहे. ८३ समभागाचा मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली तर २४ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. २४ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ६०९ समभाग लोअर सर्किटवर पोहोचले आहेत. बीएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल घसरून ३९५.३१ लाख कोटींवर पोहोचले आहे. एनएसईतील कंपन्यांचे बाजार भांडवल घसरून ३९१.५८ लाख कोटींवर पोहोचले आहे.
 
कालपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या दरात घसरण झाली असताना मात्र सकाळी किंचित वाढ झाली होती मात्र पुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात घसरण सुरू झाली आहे. युएस गोल्ड स्पॉट निर्देशांकात ०.८८ टक्क्यांनी घसरण झाली आहे. युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.८६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. संध्याकाळपर्यंत एमसीएक्सवरील सोने निर्दे शांकात ०.२४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. भारतातील २२ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात सकाळपर्यंत ७०० रुपयांनी वाढ होत सोने ७२८७० पातळीवर पोहोचले आहे तर २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅम दरात ७६० रुपयांनी वाढ होत ७२८७० रुपयांवर सोने पोहोचले आहे.
 
ओपेक राष्ट्रांच्या बैठकीत वाढीव कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय पुढे ढकलल्याने तसेच मध्यपूर्वेतील दबाव नियंत्रणात आणल्यामुळे व सकारात्मक अमेरिकन पीसीई (Personal Consumption Expenditure) दर नियंत्रणात येऊन डॉलर मध्येही घसरण झाल्याने क्रूड ( कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या WTI Future निर्देशांकात १.९८ टक्क्यांनी घसरण झाली आहे तर Brent  क्रूड निर्देशांकात १.६६ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
भारतात गेले काही दिवस शेअर बाजारात अस्थिरता होती. निकालांच्या अस्थिरतेने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतली असली तरी भारतीय गुंतवणूकदारांनी मात्र बाजारात मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार या अपेक्षेने गुंतवणूक केली होती अथवा ' कंसोलिडेशन ' काळात नफा बुकिंग केला होता. बाजारातील हाच अंडरकरंट कायम राहील अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा होती. किंबहुना काल बाजारात २२०० अंशाने बाजार वाढले होते परंतु सकाळपासून विरोधी पक्षांच्या बाजूनेही जनतेने भरभरून कौल दिल्याने भाजपा जिंकत असूनही शेअर बाजारात नुकसान झाले आहे.
 
यामध्ये भाजपाने आपल्या तिसऱ्या विजयानंतर अर्थकारणातील महत्वाचे ' Reform ' करण्याचे ठरवले होते किंबहुना पहिल्या १०० दिवसात मोठे निर्णय घेतले जाणे अपेक्षित होते. परंतु सरकार किती मताधिक्याने बनणार हे निश्चित झाले नसल्याने यावर चित्र अस्पष्ट आहे. दिवसभरात वीआयएक्स (VIX Volatility) निर्देशांक ४१ टक्क्यांवर पोहोचल्याने बाजारात अखेरच्या सत्रा पर्यंत अस्वस्थता कायम राहिली होती. परिणामी सेन्सेक्स दुपारी ५००० हून अधिक अंशाने पडला होता.आज मुख्यतः मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाली असताना हेवी वेट शेअर्समध्ये घसरण १० ते २० टक्क्यांनी झाली होती परिणामी बाजारात मोठी घस रण झाली आहे.
 
बँक निर्देशांक देखील मोठ्या प्रमाणात घसरल्याने बाजारातील भिस्त असलेला निर्देशांक आज बाजारात तरू शकला नाही. बीएसई मिडकॅप ८ टक्क्यांनी व निफ्टी ७ टक्क्यांनी घसरल्याचा फटका गुंतवणूकदारांना बसला किंबहुना बाजा रात ३९ ट्रिलियन रुपयांचे नुकसान गुंतवणूकदारांना झाले आहे.आशियाई व आंतरराष्ट्रीय बाजारात देखील भारताच्या निकालावर लक्ष लागले होते.
 
युएस बाजारात लेबर मार्केटमध्ये Job Openings and Labor Turnover Survey (JOLTS) आकडेवारी येणे अपेक्षित आहे. याशिवाय अदानी, रिलायन्स, ओएनजीसी, अदानी एंटरप्राईज, तसेच सेल, भेल, जेल यांसारख्या मोठ्या समभागात घसरण झाल्याने बाजार रिकव्हरी होऊ शकली नाही. उद्याच्या बाजाराची प्रमुख भिस्त ही निकालांच्या संपूर्ण प्रकियेवर आधारित असू शकेल.
 
आज बीएसईत एचयुएल, नेस्लेया समभागात वाढ झाली आहे तर एनटीपीसी, एसबीआय,पॉवर ग्रीड, लार्सन, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एक्सिस बँक, रिलायन्स, जेएसडब्लू स्टील,भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, एचडी एफसी बँक,अल्ट्राटेक सिमेंट,टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, एम अँड एम, आयटीसी, विप्रो, टायटन कंपनी, सनफार्मा, इन्फोसिस, टीसीएस,एशियन पेंटस या समभागात घसरण झाली आहे.
 
आज एनएसईत एचयुएल, नेस्ले, ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, हिरो मोटोकॉर्प, सिप्ला, टीसीएस, डिनीज या समभागात वाढ झाली आहे तर अदानी पोर्टस, अदानी एंटरप्राईज, ओएनजीसी, एनटीपीसी, एसबीआय, कोल इंडिया, बीपीसीएल, लार्सन, श्रीराम फायनान्स, इंडसइंड बँक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक , रिलायन्स, हिंदाल्को, भारती एअर टेल, भारती फिनसर्व्ह,बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, आयशर मोटर्स,आयटीसी, एचडीएफसी लाईफ, मारूती सुझुकी, सनफार्मा, विप्रो, बजाज ऑटो, इन्फोसिस, एचसीएलटेक, टायटन कंपनी, टेकमहिंद्रा, एशियन पेंटस, अपोलो हॉस्पिटल या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारावर परिस्थितीबाबत प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च एनालिस्ट हृषिकेश येडवे म्हणाले, ' भारतीय इक्विटी मार्केटमध्ये मार्च २०२० नंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली कारण सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपने एक्झिट पोलमध्ये अंदाजापेक्षा कमी जागा जिंकल्या, त्यामुळे अस्वस्थता दिसून आली.शेव टी, निफ्टीने दिवस २१८८४.५ वर नकारात्मक नोटवर स्थिरावला. अस्थिरता निर्देशांक (VIX) फेब्रुवारी २०२२ पासून त्याची सर्वोच्च पातळी गाठली,तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने हँगिंग मॅन कँडलची पुष्टी केली आणि त्याच्या खाली राहिले, जे कमकुवतपणा दर्शवते, त्यानंतर २१२५०, जेथे २०० DEMA आहे. याउलट, जवळच्या रनमध्ये, २२८०० आणि २३३४० पातळी महत्त्वपूर्ण अड थळे म्हणून काम करतील.'
 
बँक निफ्टी निर्देशांक नकारात्मक नोटेवर उघडला आणि सर्वत्र दबावाखाली राहिला, शेवटी दिवसाचा दिवस नकारात्मक नोटेवर ४६९२८.६० वर स्थिरावला. तांत्रिकदृष्ट्या, बँक निफ्टी हँगिंग मॅन कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या खालच्या पातळीवर टिकून आहे, ज्यामुळे कमजोरी आली आहे. डाउनसाईडवर, 100-DEMA ४६३५० च्या जवळ ठेवला आहे, जो ५११३० पातळीच्या जवळ रेझिस्टन्ससह मुख्य आधार म्हणून काम करेल.'
 
शेअर बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसने म्हटले आहे,'आजच्या बाजारातील
 
घसरणीचे कारणः
 
बाजाराने काल ज्या एक्झिट पोलला सूट दिली होती त्यापेक्षा कमी पडलेल्या निकालांमुळे ही घसरण झाली आहे. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही तर निराशा होईल आणि त्याचे प्रतिबिंब बाजारात उमटत आहे. तसेच हे शक्य आहे की मोदी 3.O बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे सुधारणा-केंद्रित नसू शकतो आणि अधिक कल्याणाभिमुख होऊ शकतो. हे एफएमसीजी समभागांच्या ताकदीवरून दिसून येत आहे.
 
गुंतवणूकदारांसाठी सल्लाः
 
निकालांनी एक्झिट पोलची पुष्टी केली तरीही गुंतवणूकदारांनी आज खरेदीसाठी घाई करण्याची गरज नाही. लार्जकॅप्समध्ये गुंतवणूक करत रहा आणि स्मॉलकॅप्समध्ये काही नफा बुकिंग करा. कालचा एक महत्त्वाचा कल म्हणजे लार्जकॅप्सने स्मॉलकॅप्सला मागे टाकले. हे प्रामुख्याने एफआयआयने खरेदीदारांकडे वळवल्याचा परिणाम आहे. एफआयआयने खरेदी सुरू ठेवल्यास, ही लार्जकॅप आउटपरफॉर्मन्स कायम राहील. RIL, L&T, HDFC, ICICI आणि M&M मजबूत विकेटवर आहेत कारण या सर्व समभागांची वाढ आणि कमाईच्या संभाव्यतेच्या प्रकाशात पाहिल्यास त्यांचे मूल्यांकन जास्त नाही. जेव्हा FII भारतात खरेदीदार बनवतात तेव्हा ते यासारखे स्टॉक खरेदी करतील आणि जास्त मूल्यवान मिड आणि स्मॉलकॅप्स नव्हे.
 
नजीकच्या काळात अस्थिरता:
 
ऐतिहासिकदृष्ट्या भारत VIX एखाद्या इव्हेंटच्या मॅच्युरिटीनंतर लगेचच कोलमडतो, जे सूचित करते की कॉल प्रिमियामध्ये अपसाइडसाठी मर्यादित जागा आहे, जरी निकाल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने एक्झिट पोलचा निकाल सर्वोत्तम असला तरीही. तथापि, व्हीआयएक्स अद्याप 20 च्या खाली घसरलेला नाही ही वस्तुस्थिती पाहता, आउटलायरची अपेक्षा अजूनही खूप उपस्थित आहे.
 
बाजारासाठी दृष्टीकोन:
 
आज देशांतर्गत बाजारात विक्रीची भीती असूनही, बाजाराने आघाडीमध्ये स्थिरतेची अपेक्षा राखली आहे, ज्याचे नेतृत्व प्रमुख निवडणूक विजयी आहे, ज्यामुळे मध्यम कालावधीत लक्षणीय घट कमी होते. यामुळे सामाजिक अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करून राजकीय धोरणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे, ज्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल. सोबतच, ऊर्जा, भांडवली वस्तू, रिअल इस्टेट आणि औद्योगिक क्षेत्रांसह, गेल्या पाच वर्षांत अव्वल स्थानावर असलेल्या क्षेत्रांना नजीकच्या काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरीसुद्धा, या क्षेत्रांसाठी दीर्घकालीन वाढीची शक्यता मजबूत राहिली आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीज हेड ऑफ रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले, ' आज बेंचमार्क निर्देशांकात मोठी सुधारणा झाली. तीव्र घसरणीनंतर, निफ्टी 1268 अंकांनी घसरला तर सेन्सेक्स 4390 अंकांनी खाली आला. क्षेत्रांमध्ये, जवळजवळ सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी उच्च पातळीवर नफा बुकींग पाहिली परंतु PSU बँका आणि ऊर्जा निर्दे शांकांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. PSU बँक १४.५० टक्के तर एनर्जी इंडेक्स ११.८ टक्क्यांनी घसरला. तांत्रिकदृष्ट्या, पहा टेच्या तीव्र विक्रीनंतर बाजाराने २० दिवसांच्या SMA (सिंपल मूव्हिंग एव्हरेज) किंवा २२५००/७४००० च्या महत्त्वपूर्ण समर्थनाचा भंग केला आणि ब्रेकडाउननंतर विक्रीचा दबाव तीव्र झाला.'
 
याव्यतिरिक्त, दैनंदिन चार्टवर निर्देशांकाने दीर्घ मंदीची मेणबत्ती तयार केली आहे आणि अल्पकालीन आणि मध्यम मुदतीच्या सरासरीच्या खाली देखील व्यवहार करत आहे, जे मोठ्या प्रमाणात नकारात्मक आहे. व्यापाऱ्यांसाठी आता, 50 दिवसांचे SMA किंवा २२४००/७३५००- आणि २२५००/७४००० हे प्रमुख प्रतिरोधक क्षेत्रे असतील तर २१६०० -२१३००/७१०००-७०२०० प्रमुख इंट्राडे सपोर्ट झोन म्हणून काम करतील. आमचे असे मत आहे की सध्याचे बाजाराचे पोत अत्यंत अस्थिर आणि अनिश्चित आहे; त्यामुळे पुढील काही ट्रेडिंग सत्रांसाठी व्यापाऱ्यांनी सावध राहावे असा सल्ला दिला जातो.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'सार्वत्रिक निव डणुकीच्या अनपेक्षित निकालामुळे देशांतर्गत बाजारपेठेत भीतीची लाट पसरली आणि अलीकडील लक्षणीय रॅली उलटून गेली. असे असूनही, बाजाराने आघाडीमध्ये स्थिरतेची अपेक्षा राखली आहे, ज्याचे नेतृत्व प्रमुख निवडणुकीत विजयी झाले आहे, ज्या मुळे ते कमी झाले आहे. मध्यम कालावधीत लक्षणीय घट यामुळे सामाजिक अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करून राजकीय धोरणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे,ज्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव पडेल, जे गेल्या पाच वर्षांत अव्वल आहेत उर्जा, भांडवली वस्तू, रिअल इस्टेट आणि उद्योगांना नजीकच्या काळात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, तरी ही, या क्षेत्रांसाठी दीर्घकालीन वाढीची शक्यता मजबूत राहील.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना स्टोक्सबॉक्स हेड ऑफ रिसर्च मनिष चौधरी म्हणाले, ' जवळपास ३५०-३७० जागांचा अंदाज असलेल्या एक्झिट पोलच्या तुलनेत जवळपास २९० जागांवर आघाडीवर असलेल्या एनडीएच्या सुरुवातीच्या ट्रेंडवर बाजाराने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आघाडीच्या भागीदारांच्या महत्त्वाच्या पाठिंब्याने NDA अजूनही सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे, तरीही मजबूत निर्णय घेण्याच्या शक्यतांमुळे बाजार अस्वस्थ दिसत आहे. बाजारांचा असा विश्वास आहे की सुधारवादी दृष्टीकोन, जो मागील दोन अटींचे वैशिष्ट्य होता, तिसऱ्या टर्ममध्ये कदाचित मागे पडेल. तथापि, आमचा अर्थ असा आहे की निष्कर्षापर्यंत जाणे अद्याप लवकर आहे आणि आदर्शपणे स्पष्ट चित्राची प्रतीक्षा करावी.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना अबानस होल्डिंग्स लिमिटेडचे रिसर्च एनालिलिटिक्स सिनियर मॅनेजर यशोवर्धन खेमका म्हणाले, ' निवडणुकीचे निकाल सध्याच्या भाजप सरकारसाठी अर्ध्यापेक्षा कमी चिन्ह दाखवत आहेत, आघाडी सर कारकडे निर्देश करत आहेत. यामुळे प्रमुख धोरणात्मक निर्णय घेण्यात मित्रपक्षांवर अवलंबून राहणे आणि मंत्रिमंडळाच्या काही जागा वाटून घेणे, ज्यामुळे धोरण लकवा आणि सरकारच्या कामकाजात अनिश्चितता निर्माण होईल.बाजार, या परिस्थितीशी निगडीत जोखीम आणि सरकारच्या समाजवादी धोरणांकडे वळवण्याच्या संभाव्य परिणामाची किंमत ठरवत आहेत, त्यामुळे बाजारात विक्री होऊ शकते.'
 
निवडणुकीच्या आखाड्यावर विश्लेषण करताना मिराई असेट कॅपिटल मार्केटचे डायरेक्टर मनिष जैन म्हणाले,'गुंतवणूक दारांना निश्चितता आणि धोरणे चालू ठेवणे आवडते. भारत ही दीर्घकालीन संरचनात्मक वाढीची कथा आहे. बरेच घटक ठिकाणी आहेत. कोणत्याही गोष्टीवर अर्थशास्त्र वरचढ असले पाहिजे. जीडीपी, मार्केट कॅप, डेमोग्राफिक डिव्हिडंड इत्यादी घटकांमध्ये आम्ही आधीच अव्वल आहोत. देशाला आणखी उंचीवर नेण्याचा सर्व धोरणकर्त्यांचा प्रयत्न असेल. मला वाटत नाही की या प्रयत्नांमध्ये कोणतीही अडचण कोणाच्याही हिताची आहे. एक देश म्हणून आपण अनेक राजवटीत बदल पाहिले आहेत.व्यवसाय आणि बाजारपेठांनी या सर्व गोष्टींचा सामना केला आहे आणि चांगल्या व्यवसायांनी गुंतवणूकदारांना नेहमीच पुरस्कृत केले आहे.काही कारणांमुळे इथून मूल्यमापन अधिक वाजवी झाल्यास, पुढे भारतात गुंतवणूक करण्याचे अधिक कारण शोधावे लागेल.'