गुंतवणूकदारांचे ३९ ट्रिलियन रुपये पाण्यात ! महत्वाच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच

लोकसभा निकालाचा फटका !

    04-Jun-2024
Total Views | 80

bse
 
मुंबई: आज लोकसभा निवडणूकीचा निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना ३९ ट्रिलियन रुपयांचे नुकसान झाले असल्याचे प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे. बीएसईवरील सूचीबद्ध कंपनीचे बाजार भांडवल ४२४ ट्रिलियन वरून घसरत ३९ ट्रिलियनवर पोहोचले आहे.
 
बीएसई मिडकॅप ८ टक्क्यांनी घसरले आहे. तर स्मॉलकॅपमध्ये १०.३ टक्क्यांनी घसरण झाली आहे. सेन्सेक्स मधील हेवी वेट कंपनी रिलायन्स, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एल अँड टी समभागात घसरण झाली आहे. एनएसईत देखील पीएसयु समभागात (Stocks) मध्ये १५.७ टक्क्यांनी घट झाली आहे. एक्झिट पोलनंतर बाजारात विश्वास असताना आता मात्र गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर पाणी पडल्याने ही मोठी घसरण झाली आहे.
 
19 एप्रिलपासून सुरू झालेल्या सात टप्प्यातील निवडणुकीचा अंतिम टप्पा संपल्यानंतर शनिवारी एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात आले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

मंदिर प्रवेशाबाबत जातीय भेदभाव थांबवा; मद्रास हायकोर्टाने स्थानिक प्रशासनावर दिली मोठी जबाबदारी

कायद्याच्या राजवटीने शासित असलेल्या देशात जातीवर आधारित कोणताही भेदभाव मान्य नाही, असे गुरूवार दि.१७ जुलै रोजी मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अय्यनार मंदिरात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या (एससी) भाविकांना अडविल्या प्रकरणी उच्च न्यायालयाने अरियालूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना आणि उदयारपलयम महसूल अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की, “पुथुकुडी येथील अय्यनार मंदिर प्रवेशासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या भाविकांना आडवू नये आणि त्यांना उत्सवात सहभागाची संपूर्ण मुभा दिली जावी.”..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121