चंद्राबाबू नायडूंचा शपथविधी सोहळा, पंतप्रधानांची विशेष उपस्थिती!

    11-Jun-2024
Total Views |
andhra pradesh cm oathनवी दिल्ली : 
   आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होणार आहे. दि. १२ जून रोजी तेलगु देसम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांचे सरकार स्थापन होणार असून १२ जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधीआधी नायडू यांनी विजयवाडा येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एनडीएच्या सर्व १६४ आमदारांसोबत बैठक घेतली आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळात एकूण २५ मंत्री असतील, ज्यात टीडीपीचे १९, जनसेनेचे ४ तर भाजपचे २ मंत्री असतील.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीसह झालेल्या १७५ जागांसाठी झालेल्या विधानसभा जागांच्या आंध्र प्रदेश विधानसभेत एनडीएने एकतर्फी विजय खेचून आणला आहे. या निवडणुकीत टीडीपीचे १३५ आमदार, अभिनेता पवन कल्याण यांच्या जनसेनेचे २१ आमदार तर भाजपचे ११ आमदार निवडून आले आहेत.