सहा वर्षाच्या चिमुरड्यावर अरमानाने केला लैंगिक अत्याचार

    11-Jun-2024
Total Views | 40
 boy
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एका सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. अरमान असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी अरमान फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन करण्यात येत आहे. ही घटना शनिवार, दि. ८ जून २०२४ घडली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रामपूर जिल्ह्यातील स्वार पोलीस स्टेशन परिसरात घडली. दि. ८ जून रोजी एका सहा वर्षीय मुलाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि सांगितले की, घटनेच्या दिवशी त्यांचा मुलगा घराबाहेर शेजारच्या मुलांसोबत खेळत होता. अरमानने तिथे पोहोचून लहान मुलाला आमिष दाखवून त्याला आपल्यासोबत नदीकाठावर नेले. तेथे वाळवंटात त्याने मुलावर अत्याचार केले.
 
अत्याचार केल्यानंतर अरमानने मुलाला सोडून दिले. पीडित मुलाने रडत रडत घरी पोहोचून संपूर्ण हकीकत घरच्यांना सांगितली. मुलाचे वडील तक्रार घेऊन अरमानच्या घरी गेले असता, आरोपीने त्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. येथून मुलाच्या वडिलांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
 
पोलिसांनी अरमानविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम ३७७ आणि POCSO कायद्याच्या कलम अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी अरमान फरार झाला. स्वार पोलिस स्टेशनचे एसएचओ इन्स्पेक्टर संदीप त्यागी यांनी मीडियाला सांगितले की, फरार अरमानच्या शोधासाठी छापे टाकले जात आहेत.
  
लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. त्याचे समुपदेशनही केले जात आहे. या प्रकरणाची चौकशी व इतर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कडक कारवाई अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर वायुवेग पथकाची कारवाई

मुंबई महानगरात काही प्रवासी अवैध मार्गाने बाईक टॅक्सीच्या माध्यमातून प्रवास करत असल्याचे निदर्शनास आले. काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःच स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला. तसेच, याबाबत परिवहन विभागाकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या. त्या अनुषंगाने विभागाकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. यामध्ये काही अप्रमाणित ॲप्स व बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालकांकडून शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अशा अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121