शेअर बाजार अपडेट: सकाळच्या सत्रात निफ्टी सेन्सेक्स वाढला मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ कायम

बँक निर्देशांकातही वाढ तर रिअल्टी समभागात सर्वाधिक वाढ

    11-Jun-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. कालच्या सकाळच्या रॅलीनंतर अखेरच्या सत्रात घसरण झाली होती. आज सकाळी गिफ्ट निफ्टीच्या वाढीनंतर पुन्हा एकदा बाजारात सकाळच्या सत्रात वाढ झाली आहे. सेन्सेक्स २०८.१७ अंशाने वाढत ७६७०७.८१ पातळीवर व निफ्टी ५० निर्देशांक ७०.६० अंशाने वाढत २३३२९.८० पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांका त ८०.७५ अंशाने वाढत ५६८८७.८३ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक ९१.८५ अंशाने वाढत ४९८७२.७५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७९ व ०.९१ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.८५ व ०.७० टक्क्यांनी वाढला आहे.निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सगळ्याच निर्देशांकात वाढ झाली आहे.सर्वाधिक वाढ रिअल्टी (१.३९%),ऑटो (०.९०%), मिडिया (०.६४%), मेटल (०.८२%), पीएसयु बँक (०.२४%) या समभागात वाढ झाली आहे.
 
बीएसईत लार्सन, टाटा मोटर्स, टाटा स्टील, टेक महिंद्रा, मारूती सुझुकी, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, एनटीपीसी,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह, विप्रो, इन्फोसिस, एक्सिस बँक, टीसीएस, भारती एअरटेल, एचसीएलटेक या समभागात वाढ झाली आहे तर एशियन पेंटस, कोटक महिंद्रा, नेस्ले, जेएसडब्लू स्टील, इंडसइंड बँक, टायटन कंपनी, सनफार्मा, रिलायन्स या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत ओएनजीसी, हिरो मोटोकॉर्प, लार्सन, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी लाईफ, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, मारूती सुझुकी, अदानी पोर्टस, एनटीपीसी, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, बजाज ऑटो, श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, डिवीज, एक्सिस बँक, विप्रो, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टीसीएस या समभागात घसरण झाली आहे.