कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला

    10-Jun-2024
Total Views | 37

कोस्टल रोड  
मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) अंतर्गत दुसरा बोगदा आज सोमवार दि. 10 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह विविध मान्यवरांच्या पाहणीनंतर खुला होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने बांधण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी असा धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प 90 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाला असून प्रकल्पाची अंतिम टप्प्यातील कामेदेखील वेगाने पूर्ण केली जात आहेत.
 
या प्रकल्पातील मरीन ड्राइव्हपासून सुरू होणारा दुसरा भूमीगत बोगदा उत्तर दिशेने जाणार्‍या वाहतुकीसाठी सुरू करण्याच्यादृष्टीने सोमवार दि. 10 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विविध मान्यवर या मार्गावर पाहणी करणार आहेत. त्यानंतर लागलीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. दर आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस या मार्गावर वाहतूक सुरू राहील. तसेच, शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्णत्वास नेणे सोयीचे व्हावे, यासाठी हा मार्ग बंद राहणार आहे.
 
वाहतूक सुलभ होणार आता प्रामुख्याने मरीन ड्राइव्ह परिसर ते हाजी अली परिसर असा उत्तर दिशेने प्रवासासाठी सुमारे 6.25 किलोमीटर लांबीचा मार्ग खुला होत आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान व हाजी अली येथील आंतरमार्गिकांचा वापर करता येणार आहे. या आंतरमार्गिकांवरून उतरून किंवा प्रवेश करून वेगवेगळ्या भागांमध्ये जाणारी वाहतूक सुलभ होईल. प्रामुख्याने बॅरिस्टर रजनी पटेल चौकातून (लोटस जेट्टी) पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकातून (हाजी अली) पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणारी वाहतूक सुलभ होणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121