“...तर तुम्हाला जाऊच दिलं नसतं”, श्रेयसची सिवन यांच्यासाठी भावूक पोस्ट

    09-May-2024
Total Views |
shreyas 
 
 
मुंबई : हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचे निधन झाले. त्याच्या निधनामुळे मनोरजंनसृष्टीत शोककळा पसरली असून कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे. सिवन यांच्या निधनामुळे अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रचंड दु:खी झाला असून त्याने अत्यंत भावूक पोस्ट सिवन यांच्यासाठी केली आहे.
 
श्रेयस तळपदे यांनी नुकतेच सिवन यांच्यासोबत ‘कापकप्पी’ या चित्रपटाच्या निमित्ताने काम केले होते. हा मल्याळम चित्रपट 'रोमंचम' चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची आठवण सांगत श्रेयस यांनी पोस्ट केली आहे. “ “प्रिय संगीत जी… मी काय बोलू? जर कापकप्पी चित्रपटाच्या डबिंगसाठी आपण भेटलो होतो तेव्हा मला थोडीशी कल्पना आली असती, तर मी तुम्हाला कधीही जाऊ दिले नसते. देवाने दिलेल्या निर्णयाची तक्रार करण्याचा अधिकार नाही. पण जर का मी इच्छा व्यक्त करु शकत असेन तर तुम्हाला आणखी १०० वर्षे आमच्याकडे ठेवण्याची विनंती करू शकतो… आम्ही तुमच्यावर नेहमीच प्रेम करू... आणि आम्हाला तुमची कायम आठवण येईल”, अशी भावूक पोस्ट श्रेयसने केली आहे.
 

shreyas 
 
संगीत सिवन यांनी दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटसृष्टीत त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले होते. १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'व्यूहम्' या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाची कारकिर्द सुरु केली होती. त्यानंतर 'योधा', 'गंधर्वम' आणि 'निर्णयम' हे मल्याळम तर 'चुरा लिया है तुमने', 'क्या कूल है हम', 'अपना सपना मनी मनी', ‘जोर’, असे अनेक चित्रपट प्रेक्षकांना दिले होते.