छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बाबरी झिंदाबाद'चे नारे

    08-May-2024
Total Views | 196

Babri Dhacha

मुंबई (प्रतिनिधी) :
देशभरात निवडणुकीचे वारे वाहत असतानाच बाबरी ढाच्याचा (Babri Dhacha) उल्लेख वारंवार समोर येत. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ छत्रपती संभाजीनगरच्या उस्मानपुरा चौकात विशाल जनसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणादरम्यान 'बाबरी झिंदाबाद'चे नारे लगावले आहेत.

हे वाचलंत का? :  "काँग्रेस आणि दहशतवाद्यांचा ये रिश्ता क्या कहलाता है?"
 
भाजपचा ४०० पारचा नारा म्हणजे संविधान संपवण्याची भूमिका असल्याचा अजब दावा असदुद्दीन ओवैसी यांनी यावेळी केला. एवढ्यावरच न थांबता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी पुन्हा आले तरी ते संविधान बदलू शकत नाहीत, असे विधानही ओवैसींनी केल्याचे पाहायला मिळते आहे. त्यामुळे जाहीर भाषणांत बाबरीचा वारंवार उल्लेख करून त्याच्या झिंदाबादचे नारे लगावणे, ही बाब निश्चितच भविष्याच्या दृष्टीने चिंताजनक असून याबाबत अनेक सवाल सध्या निर्माण होत आहेत.



'...तर राम मंदिराचा निकाल फिरवू'; राहुल गांधींनी वक्तव्य केल्याचा मोठा दावा

अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय सत्तेत येताच उलटून टाकला जाईल. ही काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींची भूमिका असल्याचा मोठा दावा काँग्रेसचे माजी नेते आचार्य प्रमोद कृष्णन यांनी केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या निकटवर्तीयांसह झालेल्या एका बैठकीत, जर आगामी निवडणुकीत काँग्रेसचे सरकार आल्यास ते एक शक्तिशाली न्यायिक आयोग स्थापन करतील आणि राजीव गांधींनी ज्याप्रमाणे शाहबानोचा निर्णय उलटवला होता, त्याचप्रमाणे राममंदिराचा निर्णयही उलटून टाकला जाईल, असे आचार्य प्रमोद कृष्णन यांनी म्हटले होते.


अग्रलेख
जरुर वाचा
अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

अहिंसेच्या वाटेवर तलवारीचा ठसका : ‘संगीत संन्यस्त खड्ग’

मराठी रंगभूमीवर परंपरेची पाठराखण करणारी अनेक नाटके आली. काही काळाच्या वाळवंटात रुतून गेली, तर काही आजही काळाच्या गर्जनेला उत्तर देताना नव्या अर्थाने समोर येतात. ’संगीत संन्यस्त खड्ग’ हे नाटक त्याच परंपरेतील एक तेजस्वी तलवार, जी केवळ शस्त्र नाही, तर विचारांची लखलखीत धारही आहे. या नाटकाची रचना स्वयं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी १९३१ रोजी केली होती. राजकीय क्रांतिकारकाच्या लेखणीतून उतरलेलं हे नाटक, केवळ नाट्यशास्त्रीय नव्हे, तर तत्त्वज्ञानाचंही एक मोठं दालन उघडतं. गौतम बुद्धाच्या काळातील शाय ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121