माधव मिश्रांची पुन्हा एन्ट्री; 'क्रिमिनल जस्टीस ४' लवकरच येणार भेटीला

    18-May-2024
Total Views | 38
pankaj tripathi  
 
 
मुंबई : अभिनेते पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या क्रिमिनल जस्टिस या वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा वकील माधव मिश्रा नवीन केस सोडवायला येणार आहेत. नुकताच 'क्रिमिनल जस्टीस ४' चा एक व्हिडीओ देखील प्रदर्शित करण्यात आला आहे.
 
Hostar च्या X हँडलवरून प्रदर्शित करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये न्यायालयाचे दृश्य दिसत आहे. आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, 'कोर्ट सुरू आहे आणि नव्या सीझनची तयारीही सुरू आहे. माधव मिश्रा येणार आहेत, असं लिहिलं आहे.
 
 
 
यापुर्वी क्रिमिनल जस्टिसच्या तीन सीझनला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. आता चौथा सीझन येत असल्यामुळे यावेळी मिश्रा कुणाची निर्दोष मुक्तता करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121