महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान माहिती नाही : शरद पवार

    16-May-2024
Total Views |

Sharad Pawar & Raj Thackeray 
 
नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं स्थान काय आहे ते माहिती नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते गुरुवारी नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील रोड शोवरही टीका केली.
 
शरद पवार म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचं नक्की काय स्थान आहे हे मला माहिती नाही. नाशिक हा त्यांचा भक्कम पाया आहे, असं मी ऐकलंय. पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत," असा टोला त्यांनी लगावला. तसेच जरी शिवसेना पक्ष फुटला असला तरी शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंसोबत आहे, असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  रेल्वेचे खासगीकरण होणार नाही; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची स्पष्टोक्ती
 
प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीन होण्याबाबत ते म्हणाले की, "मी शिवसेनेच्या विलीन होण्याबद्दल बोललो नाही. शिवसेना हा काही छोटा पक्ष नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत क्रमांक एकच्या त्यांच्या जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीत त्यांचे ५८ लोकं होते, आमचे ५२ होते आणि काँग्रेसचे ४५,४८ होते. त्यामुळे हा काही छोटा पक्ष नाही," असे ते म्हणाले. तसेच मुंबईसारख्या शहरात रोड शो वगैरे आयोजित करणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. लोकांना तासंतास ट्राफिकमध्ये थांबांवं लागतं," असेही ते म्हणाले.