मोठी बातमी! ३० नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण; काहींवर होते ३९ लाखांचे बक्षीस

    16-May-2024
Total Views |

Nexalites Surrender

मुंबई (प्रतिनिधी) :
छत्तीसगढच्या रायपुर येथील सुरक्षा जवानांना नक्षलवाद्यांविरोधातील (Nexalites) मोहिमेत यश मिळाले आहे. ३९ लाखांचे बक्षीस असलेल्या ९ नक्षलवाद्यांसह तब्बल ३० नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी १२ नक्षलवाद्यांना ठार केल्याची माहिती समोर आली होती. या वर्षात आतापर्यंत ७६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून १८० नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : लग्न कर नाहीतर तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड फेकू'; वसीमने केली मुलीवर जबरदस्ती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड सरकारच्या पुनर्वसन आणि आत्मसमर्पण धोरणामुळे प्रभावित होऊन नक्षलवाद्यांची पोकळ विचारसरणी, भेदभावपूर्ण वागणूक, दुर्लक्ष आणि अत्याचार यांना कंटाळून ३० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.