अमेरिकेत वॉलमार्टने शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला

"Automation" मार्फत आगामी ६५ टक्के कामकाज कंपनी करणार !

    14-May-2024
Total Views |

Walmart
 
 
मुंबई: वॉलमार्ट या अमेरिकन प्रसिद्ध सुपरमार्केट कंपनीने आपल्या कर्मचारी संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याशिवाय कंपनीच्या व्यवस्थापनात पुनर्रचना करण्याचे ठरवल्यानंतर अमेरिकेतील डेलास, अटलांटा, कॅनडातील टोरंटो या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मुख्य कार्यालय असलेल्या होबोकेन, दक्षिण कॅरोलिना, बेंटोनविले येथे पाठवले आहे.
 
जानेवारी ३१, २०२४ पर्यंत कंपनीत २.१ लक्ष कर्मचारी काम करतात. कंपनीने स्वयंचलित (Automation) परिस्थितीत व्यवसाय करण्यासाठी लक्ष केंद्रित केल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात कर्मचारी संख्येत घट केली आहे. भविष्यातही मोठ्या संख्येने कर्मचारी संख्येत कपात होण्याची शक्यता आहे. काही कर्मचाऱ्यांना घरातून काय करण्यास अथवा काही कर्मचाऱ्यांना पार्ट टाइम जॉब लढण्यास सांगितले आहे.
 
गेल्या वर्षीही कंपनीने कर्मचारी कपात केली होती. वॉलमार्ट कंपनीच्या अंदाजाने आगामी काळात ६५ टक्के काम हे स्वयंचलित प्रणालीत करण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून हे काम करण्यात येईल.
 
फेब्रुवारी २०२३ मध्ये अमेरिकेतील ३ तंत्रज्ञान कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तर काही कर्मचाऱ्यांना बदली करत अथवा घरातून काम करण्यास सांगितले होते.
 
या महिन्याच्या सुरुवातीला, वॉलमार्टने देखील जाहीर केले की ते सर्व ५१आरोग्य दवाखाने बंद करेल आणि त्याचे आभासी आरोग्य सेवा बंद करेल, अशी बातमी रॉयटर्सने दिली.