महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) डिजिटल क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. महापारेषणच्या मनुष्यबळ विकास विभागाने सर्व कामे डिजिटल पध्दतीने सुरू करण्यावर भर देऊन तब्बल सात ऑटोमेशन प्रकल्प पूर्ण केले आहेत. याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
Read More
वॉलमार्ट या अमेरिकन प्रसिद्ध सुपरमार्केट कंपनीने आपल्या कर्मचारी संख्येत कपात करण्याचे ठरवले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलमार्ट कंपनीने शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याशिवाय कंपनीच्या व्यवस्थापनात पुनर्रचना करण्याचे ठरवल्यानंतर अमेरिकेतील डेलास, अटलांटा, कॅनडातील टोरंटो या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना कंपनीच्या मुख्य कार्यालय असलेल्या होबोकेन, दक्षिण कॅरोलिना, बेंटोनविले येथे पाठवले आहे.
‘जनरेटीव्ह एआय’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) संचालक मंडळाची जागा घेऊ शकतील का? एकीकडे मानवी भावभावना विरुद्ध दुसरीकडे माहितीचा तंतोतंत भरलेला स्रोत, असा वाद झाला, तर कोण जिंकेल? कंपन्यांना ‘एआय’ची मदत घेऊन कारभार करण्याची वेळ येऊ शकते का? यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
जसा बदल हा निसर्गाचा नियम आहे, तसेच हल्ली तंत्रज्ञानातील बदल हादेखील उद्योग-व्यवसायात टिकून राहण्यासाठी अपरिहार्यच. तेव्हा काळाची पावले वेळीच ओळखून भारतीय कंपन्या ‘हायपरऑटोमेशन’कडे वळताना दिसतात. त्याचबरोबर तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय ‘स्टार्टअप्स’ची भरारीही तितकीच आश्वासक म्हणावी लागेल. त्याविषयी...
मुंबई विभागातून प्रवेश क्षमतेच्या तब्बल ७० टक्क्यांहून अधिक प्रवेश हे अभियांत्रिकी पदवी म्हणजेच बी.ई./बी.टेक निश्चित झाले आहेत. मुंबई शहर, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांत एकूण २८ हजार, ६६८ जागा या अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध होत्या आणि यापैकी एकूण २० हजार, ६२९ जागांवर प्रवेश निश्चिती झाला आहे. तसेच, ८ हजार, ३९ जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०’ मध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेची पुनर्बांधणी होणार आहे. अगदी पूर्व प्राथमिकपासून ते अगदी उच्चशिक्षणापर्यंत सर्वच स्तरावर हे बदल होतील. यात शिक्षणाची कौशल्य आणि संशोधनाशी सांगड घातली जाईल. हे नवे शिक्षण धोरण, सुलभता, गुणवत्ता, निःपक्षपातीपणा आणि परवडण्यायोग्य या चार तत्वांवर आधारलेलं असेल.
तुम्हाला ‘स्वदेस’ चित्रपटातला मोहन भार्गव आठवतोय का? जो शाहरुख खानने साकारला होता. तोच जो अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये संशोधक असतो आणि भारतात येतो. आपल्या देशाची परिस्थिती पाहून आपल्या लोकांसाठी तंत्रज्ञान विकसित करतो. तोसुद्धा काहीसा मोहन भार्गवसारखाच आहे. अमेरिकेत शिकला. दोन पदव्युत्तर पदवी मिळवल्या. तिथे कंपनीसुद्धा सुरु केली. पुन्हा भारतात आला. त्याने शेतकर्यांसाठी असं काही तंत्रज्ञान विकसित केलं की, शेतकर्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. हा खर्या आयुष्यातला मराठमोळा ‘मोहन भार्गव’ एका शेतकर्याचा मुलगा आह