आदिनाथ कोठारे दिसणार सुपरहिरोच्या भूमिकेत, शक्तिमान चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

    13-May-2024
Total Views |
सुपरहिरोचा नवा अवतार, मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा प्रयोग ??
 

adinath  
 
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवीन प्रयोग केले जात आहेत. वेगवेगळे विषय दिग्दर्शक, लेखक मांडताना दिसत आहेत. अशातच आता ‘शक्तिमान’ (Shaktiman) या चित्रपटातून दिग्दर्शक प्रकाश कुंटे नवा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून यावर बालकलाकार त्याच्या वडिलांना “बाबा तु होऊ शकतोस सुपरहिरो” असे म्हणताना दिसत आहे. त्यामुळे बाल प्रेक्षकांसाठी हा खास चित्रपट असणार हे निश्चित झाले आहे. तसेच, अभिनेता आदिनाथ कोठारे या चित्रपटात सुपरहिरो असणार (Shaktiman') अशा काहीशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
 
‘शक्तिमान’ ही फार वर्षांपुर्वी आलेली मालिका आणि लहान मुलांचे काही वेगळेच कनेक्शन होते. त्यामुळे आता प्रकाश कुंटे यांच्या ‘शक्तिमान’ चित्रपटाचे देखील या मालिकेशी काही कनेक्शन असणार का हे आता प्रदर्शनानंतरच समजणार आहे. दरम्यान, शक्तिमान या चित्रपटात आदिनाथ कोठारे, स्पृहा जोशी आणि प्रियदर्शन जाधव प्रमुख भूमिकेत असून बालकलाकार ईशान कुंटे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. तर, शक्तिमान हा चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.