"महिलांना १ लाख तर दोन बायका असणाऱ्याला २ लाख देऊ"; काँग्रेस नेत्याचे आश्वासन

    10-May-2024
Total Views |
 Congress
 
भोपाळ : काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देण्याच्या आश्वासनामागील हेतू नुकताच काँग्रेस उमेदवार कांतीलाल भुरिया यांच्या वक्तव्यावरून उघड झाला. मध्य प्रदेशचे माजी केंद्रीय मंत्री आणि रतलाम काँग्रेसचे अध्यक्ष कांतीलाल भुरिया यांनी येथील जाहीर सभेला संबोधित करताना महिलांना काँग्रेस एक लाख रुपये आणि दोन पत्नी असलेल्यांना दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली.
 
त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते काँग्रेस प्रत्येक महिलेला एक लाख रुपये देणार असल्याचे सांगत आहेत. सरकार येताच एक लाख देईल. यानंतर ते म्हणाले, ज्या व्यक्तीला दोन बायका आहेत, त्याला वर्षाला दोन लाख रुपये दिले जातील. याशिवाय सर्व महिलांच्या खात्यात प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचे काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात म्हटले आहे.
 
 
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारीही या रॅलीत उपस्थित होते, ज्यामध्ये काँग्रेस उमेदवाराने असे वक्तव्य केले होते. स्टेजवर बसलेल्या या लोकांनी भुरिया यांना त्यांच्या बोलण्यावर पाठिंबा तर दिलाच पण ज्याला दोन बायका असतील त्याला दुप्पट मिळते असेही सांगितले.
 
 
 
कांतीलाल भुरिया यांचे म्हणणे ऐकल्यानंतर काँग्रेस नेते त्यांना पाठिंबा देण्यापासून मागे हटत नाहीत हे विशेष. दुसरीकडे, हे विधान ऐकल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्ते विचारत आहेत की काँग्रेस मुस्लिमांना (ज्यांना इस्लाममध्ये ४ निकाह करण्याची परवानगी आहे) ४ लाख रुपये देऊ असे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
 
काही जण असेही म्हणत आहेत की अशा योजनांमुळे मुस्लिमांना अधिक विवाह करण्यास प्रोत्साहन मिळेल, दुसरे काही नाही. त्याचवेळी काही जण स्पष्टपणे विचारत आहेत की जेव्हा हिंदू दोन विवाह करू शकत नाहीत, तेव्हा ही योजना कोणत्या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रचार करत आहे.