शिवसेना ते उबाठा व्हाया मनसे! कोण आहेत ठाकरेंच्या कल्याणमधील उमेदवार वैशाली दरेकर?

    03-Apr-2024
Total Views | 193
 
Vaishali Darekar
 
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु असताना उबाठा गटाने नुकतीच चार उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यात कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ते उबाठा गट व्हाया मनसे असा प्रवास करणाऱ्या वैशाली दरेकर कोण आहेत? हे जाणून घेऊया.
 
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी लोकसभेच्या चार जागांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगाव या जागांचा समावेश आहे. उबाठा गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तसेच हातकणंगलेतून सत्यजित पाटील आणि पालघरमधून भारती कामडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  "आमच्या उष्ट्यावर उबाठाचं..."; शेलारांचा घणाघात
 
वैशाली दरेकर यांनी २००९ च्या लोकसभा निवडणूकीत कल्याणमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत जवळपास १ लाखांहून अधिक मते मिळाली होती. त्याआधी त्या शिवसेनेत होत्या. त्यानंतर वैशाली दरेकर आता परत मनसेतून शिवसेनेत आल्या असून त्यांना उबाठा गटाने कल्याण लोकसभेचे तिकीट दिले आहे. दरम्यान, कल्याणमध्ये शिवसेनेचा उमेदवार उभा राहिल्यास याठिकाणी शिंदेंची शिवसेना विरुद्ध उबाठा गट असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
बांगलादेशात ३३० दिवसांत २४४२ हिंसाचाराच्या घटना

बांगलादेशात ३३० दिवसांत २४४२ हिंसाचाराच्या घटना

बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार प्रचंड प्रमाणात वाढल्याचे नुकतेच एका आकडेवारीवरून समोर आले आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी परिषद नावाच्या संघटनेने गुरुवारी सांगितले की, गेल्या ३३० दिवसांत म्हणजेच ४ ऑगस्ट २०२४ पासून देशात अल्पसंख्याकांविरोधात २,४४२ हिंसक घटना घडल्या. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेले. महिलांवर सामूहिक बलात्कारांसह अनेक लैंगिक अत्याचार झाले. प्रार्थनास्थळांवर हल्ले झाले. या हल्ल्यांत बळी पडलेल्यांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील पुरुष, महिला आणि किशोरवयीन मुलांचा समावेश ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121