छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल जल्लोष साजरा होत असताना त्यात काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट सामील झाले नाहीत. हेच तुमचे छत्रपती शिवरायांवरचे प्रेम आहे का? असा सवाल आमदार राम कदम यांनी केला आहे.
Read More
मालवण नगरपालिका क्षेत्रातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून कोकणात उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. सोमवार, १४ जुलै रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
स्वतःचे २० नगरसेवकदेखील निवडून येणार नाहीत हे माहिती झाल्यामुळे उबाठाचे काही लोक हात धुवून मनसेच्या मागे लागले आहेत, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शुक्रवार, ११ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
पुणे जिल्ह्यातील उबाठा गट आणि मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवार, १० जुलै रोजी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील आनंदआश्रमात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
गिरणी कामगारांच्या आंदोलनातून अनेक लोकांनी राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. गुरुवार, १० जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी आता आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी केलेल्या गोष्टीचा मला अजिबात पश्चाताप नाही, असे म्हणत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार, ८ जुलै रोजी मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याने आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात धरपकड सुरू आहे.
(Kangana Ranaut) महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठी - हिंदी भाषेवरुन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. सरकारकडून हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर ५ जुलै मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचा विजयी मेळावा मुंबईत पार पडला. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरुन आता अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असा नारा दिल्याने उबाठा गटासह विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान, आता शिवसेनेनेही उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर उबाठा आणि मनसेच्या वतीने शनिवार, ५ जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या यूतीसंदर्भात एक मोठे विधान केले आहे. एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठीच असे ते म्हणाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
त्रिभाषा सूत्री आणि हिंदी भाषेचा मुद्दा आम्ही प्रतिष्ठेचा केला नाही. ज्यांनी हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा केला ते उद्धव ठाकरे आणि उबाठा गट आता साफ तोंडावर आपटले आहेत, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. सोमवार, ३० जून रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला.
उबाठा गटाचे नाशिकमधील महानगर प्रमुख विलास शिंदे हे नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप केला असून लवकरच ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला १५ दिवसांमध्ये नाशिकमध्ये दुसरा तडाखा बसला असून सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ महानगर प्रमुख विलास शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. प्रभागातील ४ तर इतर ४ असे आठ नगरसेवक आणि असंख्य कार्यकर्त्यांसह रविवार दि. २९ जून रोजी ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
उबाठा गटातील पुण्यातील नेते महादेव बाबर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. मंगळवार, २४ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं, असे म्हणत उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. तसेच यावेळी त्यांनी मंत्रिपद न मिळाल्याची खंतही बोलून दाखवली.
उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या नाराजीच्या बातम्या चुकीच्या असून मी नाराज नाही असे ते म्हणाले. सोमवार, २३ जून रोजी त्यांनी रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला.
ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये, असा हल्लाबोल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसे-उबाठा यूतीच्या चर्चांवरून त्यांनी नाव न घेता संजय राऊतांनाच हा टोला लगावल्याचे सांगण्यात येत आहे.
आपला मेळावा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा तर दुसरा मेळावा सत्तेसाठी लाचार झालेल्यांचा आहे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो, तसा त्यांचा जीव बीएमसीच्या तिजोरीत आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केला आहे. गुरुवार, १९ जून रोजी वरळीतील डोम सभागृह येथे शिवसेनेचा ५९ व्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना संपली नाही म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धवजी तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन असून दोन्ही पक्षांकडून वेगवेगळे मेळावे घेण्यात येणार आहे. गुरुवार, १९ जून रोजी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. दरम्यान, या मेळाव्यात दोन्ही पक्ष महापालिका निवडणूकांचे रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या दोन्ही पक्षांकडून वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्याआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे एक व्यंगचित्र चांगलेच व्हायरल होत आहे. या व्यंगचित्रातून हिंदूत्वाच्या मुद्दयावरून उबाठा गटाला डिवचल्याचे सांगण्यात येत आहे.
नाशिकमधील उबाठा गटाच्या अनेक माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवार, १७ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेशाने उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी सगळ्या मराठी माणसांनी एकत्र आले पाहिजे, असे राजसाहेब म्हणाले होते. याचा आपल्या सोयीनुसार कुणी अर्थ काढत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे, असा पलटवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उबाठा गटावर केला आहे. शनिवार, १४ जून रोजी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उबाठा पक्षाचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवार, १० जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
सांगली जिल्ह्यातील उबाठा गटाचे शिलेदार डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोमवार, ९ जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच चंद्रहार पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनीही यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
ज्या माणसासाठी आम्ही प्रतिष्ठा पणाला लावली त्यानेसुद्धा बेईमानी करावी, अशी खंत संजय राऊतांनी व्यक्त केली आहे. उबाठा गटाचे सांगलीतील नेते डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावर राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली.
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना राजकीय रंग चढत असतानाच, ’उबाठा’ गटात नव्या नाराजीचा स्वर उमटू लागला आहे. नाशिकनंतर आता कोकणातही असंतोषाचे वादळ उठले आहे.
राज्यभरात उबाठा गट आणि मनसेच्या यूतीच्या चर्चा सुरु असून आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. आमच्या सरकारने जनतेला दिलेला संकल्पनामा पूर्ण करण्यासाठी आम्ही लढतो आहोत. आम्हाला इतर गोष्टीत रस नाही, असे ते म्हणाले.
एकत्र येण्याबाबत राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तरच काहीतरी होईल. त्यामुळे आता त्यांची इच्छा असल्यास त्यांनी फोन करावा, अशी प्रतिक्रिया मनसे नेते आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी दिली आहे. उबाठा गट आणि मनसेच्या यूतीबाबात आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी माध्यमांशी संवाद साधत ही प्रतिक्रिया दिली.
आमच्या भावना निर्मळ, स्वच्छ आणि स्पष्ट आहे. महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार आहोत, असे विधान उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. मनसे आणि उबाठा गटाच्या यूतीबाबत त्यांनी गुरुवार, ५ जून रोजी ही प्रतिक्रिया दिली.
उबाठा गटाचे नेते चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली असून यामुळे उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. येत्या सोमवारी चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी बुधवार, ४ जून रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत उबाठा गटाचे नाशिकचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची बुधवार, ४ जून रोजी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, आता बडगुजर यांनी हकालपट्टीनंतर यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उबाठा गटाचे सांगलीतील नेते चंद्रहार पाटील हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, आता चंद्रहार पाटील यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर याबद्दल पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
उबाठा गटाचे नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर हे पक्षात नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सुधाकर बडगुजर हे संजय राऊतांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच उबाठा गटात भूकंप येणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
संजय राऊतांएवढी दलाली आजपर्यंत कुणीही केलेली नाही. उद्धवजींनी आवरले नाही तर त्यांच्याकडे पुढे कुणीच राहणार नाही, असा घणाघात मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवार, ३ जून रोजी केला आहे. संजय राऊतांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले.
ठाकरे बंधू एकत्र यावे ही आमची प्रामाणिक ईच्छा आहे, असे म्हणत उबाठा गटाकडून पुन्हा एकदा यूतीकरिता मनसेला साद घालण्यात आली आहे. सोमवार, २ मे रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असताना उबाठा गटाचे नेते सुनील प्रभू यांनी ही प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल जे अपशब्द वापरले त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी जेव्हा नाशिकमध्ये येतील तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा धमकीवजा इशारा उबाठा गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत बिघाडी आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक जिल्ह्यात उबाठा गटाला मोठा झटका बसला आहे. माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह उबाठा गटाच्या उपनेत्या, अनेक पदाधिकारी आणि इगतपुरी तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १५०० महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्यभरात सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषत: मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पावसाळी पर्यटन करणारे युवराज आदित्य ठाकरे यांना मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करून चांगलाच आरसा दाखवला.
उबाठा गट, नीचपणाचा अजून किती तळ गाठणार? असा संतप्त सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ऑपरेशन सिंदूरचे पुरावे मागत भारतीय सैन्याचा अवमान केला. या कार्यक्रमात केशव उपाध्येसुद्धा उपस्थित होते.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कटकमिशनवाल्या गिधाडांच्या घिरट्या सुरु आहे, असा हल्लाबोल मंत्री आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंसह उबाठा गटावर केला आहे. तसेच त्यांनी मुंबकरांना सावधानतेचा इशारादेखील दिला आहे. गुरुवार, १५ मे रोजी त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर यासंबंधी एक पोस्ट केली आहे.
ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट मानली जाते. त्यामुळे ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. राज्यभरात सध्या अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
(Harshad Prakash Karkar left UBT and joined Shiv Sena) मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उबाठाला 'जय महाराष्ट्र' करीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कारकर यांनी शुक्रवार, दि. ९ मे रोजी शिवसेनेत प्रवेश केला.
(Sanjay Raut) 'वेगळा गट म्हणून राहिल्यास अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री होता येणार नाही', असे विधान उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेसंदर्भातील वक्तव्याबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा दावा केल्याने सध्या चर्चांना उधाण आले आहे.
उबाठा गटाला लागलेली गळती दिवसेंदिवस वाढत असून आता नवी मुंबई महापालिकेतही त्यांना जोरदार धक्का बसला आहे. नवी मुंबई महापालिकेतील उबाठा गटाचे माजी नगरसेवक आणि पक्षाचे प्रतोद रतन मांडवे तसेच त्यांच्या पत्नी सुनीता रतन मांडवे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
उबाठा आता एक मुस्लीम लीग झाली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे नाव बदलून स्वत:ला मुस्लीम लीग असे म्हटले पाहिजे, असा घणाघात मंत्री संजय शिरसाट यांनी उबाठा गटावर केला आहे. शुक्रवार, २ मे रोजी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.