टाटा पॉवरची हरित ऊर्जा क्रांती

राज्यातील दोन प्रकल्पांमुळे मुंबई हरित ऊर्जा संपन्न

    26-Apr-2024
Total Views |

tata power

मुंबई, दि.२६ : 
मुंबईकरांना हरित ऊर्जा संपन्न करण्यासाठी टाटा पॉवरच्या माध्यमातून महाराष्ट्रात पर्यावरणपूरक पवन आणि सौरऊर्जा पार्क उभारत ऊर्जानिर्मिती क्षेत्रात लक्षणीय आघाडी गाठली आहे. साताऱ्यातील आगासवाडी पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये टाटा पॉवरने नैसर्गिक वाऱ्यांच्या गतीज ऊर्जेचा वापर केला असून वर्षाला जवळपास १०० मिलियन युनिट्स (केडब्ल्यूएच) वीज निर्माण केली जाते.

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये असलेल्या ४९.५ मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये ३३ रिजेन मेक मॉडेल व्ही-७७ च्या १५०० केडब्ल्यू क्षमतेच्या पवनचक्क्या बसवण्यात आल्या आहेत. पवन ऊर्जा तंत्रज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून, बिनशेती जमिनीवर वाऱ्याची इष्टतम घनता असलेल्या मोक्याच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. याठिकाणी अतिशय कार्यक्षम ऊर्जा निर्मिती केली जाते. हा प्रकल्प उभारताना वाहतूक आणि पायाभूत सोयीसुविधांच्या बांधकामासहित इतर अनेक आव्हाने होती. मात्र यावर मात करत आगासवाडी पवन ऊर्जा प्रकल्पामध्ये दरवर्षी अंदाजे ७०,३०० टन कार्बन उत्सर्जन ऑफसेट केले जाते. एमएसईटीसीएल आणि एमएसईडीसीएल ग्रिड्सना ऊर्जा पाठवणारा हा पवन ऊर्जा प्रकल्प या क्षेत्रातील शेती आणि ग्रामीण समुदायासाठी महत्त्वाचा ऊर्जा स्रोत बनला आहे.

पळसवाडी सौर प्रकल्पामध्ये दरवर्षी जवळपास १०० मिलियन युनिट्स शुद्ध ऊर्जा निर्मिती केली जाते. मुंबई लोड सेंटरची मागणी पूर्ण करण्यासाठी अतिशय मोक्याच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या या सौर प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे ७०,००० टन कार्बन उत्सर्जन ऑफसेट केले जाते. उपकरणांची वाहतूक, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता अशा अनेक अडचणी येऊन देखील पळसवाडी सौर प्रकल्प या क्षेत्राच्या ऊर्जा मागण्या पूर्ण करतो तसेच कार्बन फूटप्रिंट्स कमी करण्यात लक्षणीय योगदान देतो.

आगासवाडी पवन ऊर्जा प्रकल्प आणि पळसवाडी सौर ऊर्जा प्रकल्प टाटा पॉवर मुंबई डिस्ट्रिब्युशन आणि सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ऊर्जा पुरवतात. विविध श्रेणींमधील ग्राहकांना पर्यावरणपूरक ऊर्जा सुविधा पुरवण्यातील त्यांचे महत्त्व यातून दिसून येते. नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांसाठी टाटा पॉवर सातत्याने प्रयत्नशील आहे. पर्यावरणाचे संवर्धन आणि संरक्षण तसेच प्रकल्पांच्या आजूबाजूच्या समुदायांच्या आर्थिक विकासाला चालना देण्याप्रती कंपनीची वचनबद्धता त्यांच्या नूतनीकरणीय ऊर्जा उपक्रमांमधून ठळकपणे दिसून येत आहे.