शेअर बाजार विश्लेषण: तिसऱ्या दिवशी शेअर बाजार सुपरहिट ! मिडकॅप व स्मॉलकॅपमधील रॅली कायम !

सेन्सेक्स ११४.४९ अंशाने वाढत ७३८५२.९४ वर निफ्टी निर्देशांक ३४.४० अंशाने वाढत २२४०२.४० पातळीवर मेटल, हेल्थकेअर समभाग चमकले

    24-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज शेअर बाजाराची अखेर नफ्याने झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज वाढ कायम राहिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. एस अँड पी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात वाढ झाल्याने आज बाजारात वाढ झाली आहे. सेन्सेक्स ११४.४९ अंशाने म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी वाढत ७३८५२.९४ वर पोहोचले आहे.निफ्टी निर्देशांक ०.१५ टक्क्यांनी म्हणजेच ३४.४० टक्क्यांनी वाढ होत २२४०२.४० पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकातही आज वाढ कायम राहिली आहे. तुलनेने बँक सेन्सेक्स व निफ्टीतील बँक निर्देशांकात वाढ कायम राहिल्याने आज बाजारात अखेरचे सत्र वाढीत स्थिरावले आहे. बीएसई बँक निर्देशांक ०.५० टक्क्यांनी वाढत म्हणजेच २७०.५८ अंशाने वाढत ५४५८९.७१ पातळीवर स्थिरावला आहे.निफ्टी बँक निर्देशांक ०.४६ टक्क्यांनी म्हणजेच २१८.५५ अंशाने वाढत ४८१८९.०० पातळीवर पोहोचला आहे.बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.९२ व ०.७९ टक्क्याने वाढ झाली.एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७९ व ०.४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये आज सर्वाधिक वाढ मेटल (२.६९) हेल्थकेअर (१.२६%) समभागात झाली आहे. त्यानंतर अधिक वाढ रिअल्टी (०.८९%), प्रायव्हेट बँक (०.४६ %) फार्मा (०.६६%) समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक घसरण आयटी (०.८१ %) समभागात झाली आहे.आयटी व्यतिरिक्त मिडिया (०.२९%), पीएसयु बँक (०.२३%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज ३९२९ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २२५६ समभाग वधारले आहेत तर १५६२ समभागात घसरण झाली आहे. त्यामधील २६७ समभागांचे आज मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून ११ समभागांचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे. एकूण ३७९ समभागांचे मूल्य आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहे तर १७२ समभागांचे मूल्यांकन आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहे.
 
एनएसईत आज २७१० समभागांचे ट्रेडिंग झाले असताना १६२९ समभाग वधारले असून ९७३ समभाग आज कोसळले आहेत. त्यातील १५० समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक किंमतीवर स्थिरावले असून ६ कंपन्याचे समभाग आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी किंमतीवर स्थिरावले आहेत.दिवसभरात १५८ कंपन्याचे समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ४३ कंपन्याचे समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ४०१.३१ लाख कोटींपर्यंत पोहोचले असून एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ३९८.१० कोटी रुपये इतके राहिले आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत स्थिरावली आहे. रुपयाच्या किंमतीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव रहित वातावरणामुळे कोणताही विशेष बदल झालेला नाही किंबहुना रुपया तीन ते चार पैशानी वधारला आहे.
 
सोन्याच्या दरात दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज भावात वाढ झाली आहे. भारतात प्रति १० ग्रॅम किंमत ४८० ते ४९० रुपयांनी वाढली आहे. क्रूड तेलाच्या निर्देशांकात जागतिक पातळीवर घसरण झाल्याने आशियाई बाजारातील तेलाचे भाव स्थिर राहिले होते. एमसीएक्सवर सोने निर्देशांकात ०.१७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. प्रति बॅरूल क्रूड तेलाचे भाव ६९१६ रुपयांवर पोहोचले आहेत.
 
आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील ३०४४.५४ कोटीचीं गुंतवणूक काढून घेतली होती. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २९१८.९४ कोटींचे समभाग विकत घेतले होते. अमेरिका,युरोप व आशिया पॅसिफिक खंडातील सगळ्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. मुख्यतः तंत्रज्ञान समभागात आज वाढ झाल्याने अमेरिकन बाजारात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. दुसरीकडे इस्त्राईल व इराण यांच्यातील संघर्षाची नवी ठिणगी न पडल्याने क्रूड तेलाच्या पुरवठ्यात कुठलाही बदल झालेला नाही.
 
भारतातील अर्थव्यवस्थेतील आकडेवारीत मॉर्गन स्टेनलेने भारतात मोठ्या जीडीपी वाढीची शक्यता काल नोंदवली होती. याशिवाय कंपन्यांच्या सकारात्मक तिमाही निकालाने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळावला आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कुठलाही बदल इतक्यात होण्याची शक्यता नसल्याने आज बाजारात सगळे सुरळीत चालू होते. याशिवाय अमेरिकन शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी तिमाही निकालाचे आपला मोर्चा वळवला असल्याने आज बाजारात सकारात्मक प्रतिसाद बाजारात मिळाला होता. लार्ज कंपन्यांच्या तुलनेत आज मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी वाढ झाल्याने आज बाजारात रॅली झाली आहे.
 
बीएसईत आज जेएसडब्लू स्टील,टाटा स्टील, पॉवरग्रीड,कोटक महिंद्रा,अल्ट्राटेक सिमेंट,एनटीपीसी,बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक,टाटा मोटर्स,लार्सन,एक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह,एचडीएफसी बँक एसबीआय इंडसइंड बँक,सन फार्मा या समभागात आज वाढ झाली आहे. टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस,रिलायन्स,भारती एअरटेल,एचसीएलटेक,मारूती सुझुकी,एशियन पेंटस,एम अँड एम,आयटीसी या समभागात आज घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज हिंदाल्को, सिप्ला, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील,पॉवर ग्रीड, कोटक बँक,अल्ट्राटेक सिमेंट,श्रीराम फायनान्स, एक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह,ओएनजीसी,कोल इंडिया,आयसीआयसीआय बँक ब्रिटानिया या समभागात फायदा झाला आहे. टाटा कनज्यूमर,ग्रासीम,बजाज ऑटो,एचडीएफसी लाईफ,टीसीएस,अदानी एंटरप्राईज, मारूती, टायटन, एसबीआय लाईफ, इन्फी,रिलायन्स,भारती एअरटेल,एचसीएलटेक,विप्रो,एम अँड एम या समभागात आज घट झाली आहे.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,'अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुक जगातील 'फील गुड फॅक्टर' निर्माण करत आहे म्हणजे दोन ठिकाणी चाललेले युद्ध तीन ठिकाणी होऊ नये या साठीचे प्रयत्न त्यांच्या पद्धतीने करीत आहे जेणे करून कच्चे तेलाचे दर वाढणार नाहीत,त्यामुळे महागाई नियंत्रणात राहील व व्याज दरात कपात शक्य होईल व उद्योग क्षेत्र खुश होईल .महागाई निर्देशांक आटोक्यात आणण्यात यश मिळे सामान्य जनता खुश होईल असे प्रयत्न सर्व स्तरावर सुरू आहेत.म्हणुन डाओ जोन्स बरा परफॉर्मन्स दाखवत आहे.आपल्याकडेही सार्वत्रिक निवडणुका मधून नवीन स्थिर सरकार येईल व या सर्व गोष्टींसाठी सकारात्मक असेल या अपेक्षेने आपला बाजारही या सर्व पार्श्वभूमीवर पॉझिटीव्ह आहे. जागतिकीकरणाचे परिणाम ओळखुन आपल्याकडेही पुढील तेजीच्या तयारीत आहे.
 
रिलायन्स इंडस्ट्रीज व जिओ नवीन नवीन क्षेत्रात येण्याची तयारीत आहेत. HDFC बॅक ही मर्जरनंतर (विलीनीकरणानंतर) खाजगी क्षेत्रातील खुप मोठी मानाचे स्थान असलेली बॅक झालेली आहे.या दोन्ही शेअरचे निर्देशांकातील हिस्सा पाहता निर्देशांक पॉझिटीव्ह राहील.आज डिफेन्स,बॅकिग,स्टील तसेच सरकारी कंपन्या यात तेजी पहायला मिळाली.एकंदरीत हे वर्ष बाजारासाठी सकारात्मक असेल असे वाटतं.'
 
बाजारातील स्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,' भारतीय बाजार आशियाई समवयस्कांच्या तुलनेत मागे राहिले कारण आयटीच्या कमकुवत परिणामांमुळे Q4 ची कमाई मोठ्या प्रमाणात कमी राहिली आणि काही इंडेक्स हेवीवेट परिणाम देखील निराश झाले. तथापि, मजबूत उत्पादन आणि सेवा क्षेत्रांमुळे उत्साही, भारतीय संमिश्र PMI अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले, जे देशांतर्गत प्रतिबिंबित करते. बाजारातील लवचिकता तसेच जागतिक स्तरावर,मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्याने आणि तेलाच्या किमती घसरल्याने गुंतवणूकदारांच्या भावना सुधारल्या.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले ,'आम्ही आता चौथ्या तिमाहीच्या कमाईच्या निकालांमध्ये आलो आहोत आणि आम्ही आतापर्यंत India Inc साठी चांगले आकडे पाहत आहोत.यासह आम्ही आता काही कंपन्यांच्या नंबर रिपोर्टिंगपासून ते मार्केटमधील इतर घडामोडीपर्यंतच्या आजच्या सर्व ठळक बातम्या पाहतो.
 
जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीचे सीईओ जेमी डिमन यांच्या म्हणण्यानुसार,पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात अविश्वसनीय काम करत आहेत,ज्यांनी असेही म्हटले की अमेरिकेतील उदारमतवादी प्रेस त्यांच्याकडून नरक मारते, जेव्हा त्यांनी ४०० दशलक्ष लोकांना दारिद्र्य रेषेखालुन बाहेर काढले.मोदींनी भारतात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यांच्यामुळे ४०० दशलक्ष लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. जेव्हा त्यांना आमच्यासोबत व्यापार करायचा असेल, तेव्हा आम्ही मोदींना व्याख्यान देण्यासाठी जातो.त्यांच्या ४०० दशलक्ष लोकांना बाथरूमची गरज आहे.त्यांना काय करावे याबद्दल आम्ही त्यांना सूचना देत आहोत.
 
टाटा Elxsi ला मॉर्गन स्टॅन्लेने कमी वजन म्हणून रेट केले आहे, ज्याची लक्ष्य किंमत ६८६० रुपये प्रति शेअर आहे. Q4 ची अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी असूनही,व्यवस्थापनाने FY25 च्या विक्री वाढीबद्दल आशावाद व्यक्त केला.मॉर्गन स्टॅन्लेने नमूद केले आहे की उच्च अपेक्षा आणि चढत्या किमती लक्षात घेता, अनुकूल अभिप्राय पुरेसा नसू शकतो.याव्यतिरिक्त, त्यांनी FY25 आणि FY26 साठी त्यांचा अंदाजित EPS अनुक्रमे -३.९% आणि -५.४ % ने कमी केला आहे.
 
24 एप्रिल रोजी, जेव्हा भारती एअरटेलने इंडस टॉवर्समध्ये व्होडाफोन समूहाचे स्वारस्य संपादन करण्याच्या चर्चेत असल्याच्या अफवांचे खंडन केले, तेव्हा इंडस टॉवर्स लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया या दूरसंचार कंपन्यांचे समभाग ८% इतके घसरले.टेलिकॉमने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की इंडस टॉवर्सला व्यवसायात आर्थिकदृष्ट्या एकत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पलीकडे मालकी वाढवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नाही. एका मीडिया स्रोताने सांगितले की भारती एअरटेल इंडस टॉवर्सच्या २१.०५ टक्के भागासाठी व्होडाफोन ग्रुप, यूके-आधारित कंपनी, खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करत आहे, ज्यामुळे कंपनीचे संभाव्य नियंत्रण मिळू शकते.लेखानुसार, ज्याने अज्ञात स्त्रोतांचा हवाला दिला आहे, जर संपादन पूर्ण झाले, तर ब्रिटीश वाहक कमाईचा काही भाग व्होडाफोन आयडिया, त्याच्या कर्जदार भारतीय विभागामध्ये टाकू शकेल.
 
निप्पॉन लाइफ एएमसीने मागील आर्थिक वर्षात १९८ कोटी रुपयांवरून ७३% पेक्षा जास्त निव्वळ नफ्यात वर्ष-दर-वर्षी वाढीची घोषणा केली आहे.मागील वर्षीच्या याच वेळेच्या तुलनेत, महसूल ३४८.३ कोटी रुपयांवरून ३४.५ % वाढून ४६८.३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.क्लोजिंग बेलवर, ७३८५२.९४ वर सेन्सेक्स ११४.४९ अंक किंवा ०.१६ टक्क्यांनी वधारला होता, तर निफ्टी ३४.४० अंकांनी किंवा ०.१५ टक्क्यांनी वाढून २२४०२.४० वर पोहोचला होता.अंदाजे २८१४ शेअर्स वाढले, १४५८ शेअर्स कमी झाले आणि १३४ शेअर्स समान राहिले.'
 
आज बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जेएम फायनांशियलचे उपाध्यक्ष ईबीजी कमोडिटी व करंसी रिसर्च प्रणव मेर म्हणाले,' सत्रांमध्ये आतापर्यंत सोने आणि तेलाच्या किमतींमध्ये स्थिर हालचाली दिसून आल्या आहेत,कारण आता फोकस यू.एस. फेडच्या दर कपातीच्या धोरणावरील संभाव्य मार्ग समजून घेण्यासाठी गुरुवारी यू.एस.जीडीपी डेटा आणि शुक्रवारी पीसीई महागाईवर वळतो आहे एक कमकुवत उत्पादन/सेवा PMI मधील वाढीमुळे अशी अपेक्षा निर्माण झाली आहे की यूएसची अर्थव्यवस्था मंदावली आहे,जी लवकर दर कपातीसाठी उपयुक्त ठरेल. तांत्रिकदृष्ट्या किमती ७१२१० च्या खाली येईपर्यंत गती सुधारित दिसते.७०५५०-७०२०० वर डाउनसाइडला सपोर्ट आहे.
 
कच्च्या तेलासाठी ७०२०/७०७० वर प्रतिकार आणि ६८००/६७४० वर सपोर्टसह गती थोडी एकत्रित दिसते.दिवसाच्या उत्तरार्धात, यू.एस. साप्ताहिक तेल इन्व्हेंटरी डेटावर लक्ष केंद्रित केले जाईल.'