दोन वर्ष ताहेर पठाणचा पीडितेवर अत्याचार! अखेर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल!

    19-Apr-2024
Total Views |
love jihad case

छ. संभाजीनगर : जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केले आणि वारंवार तीन जणांनी एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी ताहेर तय्यब पठाण,तय्यब शब्बीर पठाण आणि आयेशा ताहेर पठाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ताहेरने स्वत:ची ओळख लपवून एका तरुणीला जाळ्यात ओढले. तसेच तिला ३ मौलांनाकडे नेत दि. ११ फेब्रुवारीला जबरदस्तीने तिचे धर्मांतर आणि निकाह केला. मांस खाऊ घातले, बुरखा घालण्याची सक्ती केली, अत्याचार केला. फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेचा छळ केला.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मार्च २०२० ते एप्रिल २०२४ असे चार वर्ष पीडितेवर अत्याचार झाला. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात ताहेर पठाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत पीडितेने सांगितले की, २०१९ मध्ये सेव्हन हिल परिसरातील एका दुकानामध्ये ताहेरशी ओळख झाली. त्यावेळी त्याने त्याचे नाव समीर पटेल सांगून गुजराती असल्याचे भासवले. दरम्यान अविवाहीत असल्याचे दाखवून त्याने मार्च २०२० मध्ये ताहेरने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला. त्यानंतर दोन वर्ष तो पीडितेसह रिलेशनमध्ये होता. दरम्यान पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.