मुंबई (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला धुळ्यातील दोंडाईचा येथे काही धर्मांधांकडून गालबोट लागल्याचे समोर आले आहे. डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या स्थानिक मिरवणुकीवर (Ambedkar Jayanti Miravnuk) दगडफेक करत जाणीवपूर्वक लक्ष्य केल्याप्रकरणी विशिष्ट समुदायातील २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ७ जणांना अटक केली आहे.
एका स्थानिक वृत्तानुसार डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी संध्याकाळी स्थानिक जामा मशिद परिसरात घडली. मशिदीजवळून मिरवणूक जात असताना धर्मांधांनी मिरवणुकीतील उपस्थितांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी धर्मांधांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
भारतीय दंड संहिता, १८६० नुसार कलम १४३, १४६, १४७, १४९, २९५ आणि २९६ अंतर्गत २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी साहिल लाला बागवान, समीर लाला बागवान, इसाक मिस्त्री, कल्लू पठाण, विहान बागवान, कौसर मुसा खाटीक, आणि अज्या खाटिक या सात जणांना ताब्यात घेतले आहे. प्रकरण शांत झाले असून यासंदर्भात चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.