डॉ. तेजस्विनी गोळे यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी कार्यक्रम

    05-Feb-2024
Total Views |
bjp womens programme in pune

पुणे :
पद्मनिधी महिला संघटना जनसंपर्क कार्यालयातर्फे उंड्री, पुणे येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दि. ०४ फेब्रुवारी २०२४ रोजी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी सदस्या, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ प्रदेश प्रभारी, पद्मनिधी महिला संघटना अध्यक्षा डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे यांनी भव्य हळदी कुंकू समारंभ व लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन केले.
 
या कार्यक्रमात बोलताना डॉ. गोळे यांनी सांगितले आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वखाली महिलांना साठी नवीन कायदे, व महिलांना साठी केलेल्या नवनवीन योजनेची माहिती दिली. नारीशक्ती चे महत्वत सांगितले. यानंतर महिलांसाठी लकी ड्रॉ कार्यक्रम ठेवण्यात आला.
 
या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना पहिले बक्षीस महाराणी पैठणी, दुसरे बक्षीस कुकर, व तिसरे बक्षीस इस्त्री देण्यात आले या नंतर महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व उखाणे स्पर्धा घेण्यात आली. या वेळी RSS संघाच्या जेष्ठ कार्यकर्त्या लीना मोदे, नगरसेविका पद्मजा गोळे, पद्मनिधी महिला संघटना सदस्य नैना जाधव, अपर्णा देवलालिकर, सारिका कानडे, सविता मावस बहु संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121