मुंबई : अलीकडे मराठी कलाकार एकामागून एक लग्नाच्या बेडीत अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपासून अभिनेता प्रथमेश परब लग्न करणार अशी चर्चा सुरुच होती आणि अखेर तो क्षण आलाच. दगडूला त्याच्या जीवनातील प्राजू भेटली आणि तो बोहल्यावर चढला. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा थाटामाटात साखरपुडा झाला. त्यानंतर सर्व चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता होती. अखेर प्रथमेश लग्नबंधनात अडकला आहे. क्षितीजा घोसाळकर सोबत प्रथमेशने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
अभिनेता प्रथमेश परबने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले की, “अखेर लॉकडाऊन लव्हस्टोरीचे हृदय कायमसाठी लॉक झाले.” या लग्नाच्या फोटोंमध्ये दोघंही फार सुंदर दिसत असून खूप आनंदात पाहायला मिळत आहे. लग्नासाठी दोघांनी खास पारंपरिक लूक केला होता.
प्रथमेशची बायको क्षितीजा एक फॅशन मॉडेल आहे. याशिवाय ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती देखील आहे. क्षितीजाला लिखाणाची खूप आवड असून तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये देखील कार्यरत आहे.