"नाना पटोलेंमुळे काँग्रेसमधील आमदार नाराज!"

    13-Feb-2024
Total Views | 76

Patole
 
मुंबई : नाना पटोलेंमुळे काँग्रेसमधील सर्व आमदार नाराज आहेत, असा खुलासा काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनी केला आहे. अमर राजूरकर यांनी मंगळवारी अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
अमर राजूरकर म्हणाले की, "नाना पटोलेंमुळे सर्व आमदार नाराज आहेत. ज्या काही याद्या जाहीर झाल्या आहेत त्यामध्ये नाना पटोलेंनी जे लोकं निवडणुकीत पडले आहेत त्यांना कार्यकारिणीत घेतलं आहे. जे आमदार लोकांमधून निवडून येतात त्यांना बाहेर ठेवलं आहे," असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
 
मंगळवारी मुंबईतील भाजपच्या कार्यालयात काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण आणि माजी आमदार अमर राजूरकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121