आसाममध्ये लाखाहून अधिक लोक परदेशी?, मुख्यमंत्री सरमा यांची माहिती

    13-Feb-2024
Total Views |
CM Himanta Biswa Sarma on NRI Citizens

नवी दिल्ली : राज्यातील परदेशी न्यायाधिकरणाने आतापर्यंत १ लाख ५९ हजार नागरिकांना परदेशी म्हणून चिन्हित केले आहेत, तर ९६ हजार जणांना संशयित (डी मार्क) म्हणून चिन्हित केले आहे, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी विधानसभेत दिली आहे.

विधानसभेत विरोधी एआययूडीएफचे आमदार अमिनुल इस्लाम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सर्मा म्हणाले, राज्यातीलनागरिकत्वाच्या मुद्द्याशी संबंधित १०० परदेशी न्यायाधिकरणे सध्या कार्यरत आहेत. या न्यायाधिकरणांनी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत १,५९,३५३ लोकांना परदेशी म्हणून घोषित केले आहे.

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे माहिती दिली की परदेशी न्यायाधिकरणांनी गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत ३,३७,१८६ प्रकरणे निकाली काढली आहेत आणि ९६,१४९ प्रकरणे विविध न्यायाधिकरणांसमोर समोर प्रलंबित आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.