मुंबई : उबाठातील आपसी गँगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली आहे. नितेश राणेंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत राऊतांवर निशाणा साधला.
नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक! उबाठातील आपसी गैंगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंदी करायला लागेल," असा घणाघात त्यांनी संजय राऊतांवर केला आहे.
महाराष्ट्रात कुणाचे राज्य हे सर्वांना ठावूक! ऊबाठातील आपसी गैंगवॉरचे खापर फडणवीस साहेबांवर फोडू नका. तसेही शरद पवारांच्या कुत्र्याने जास्त भुंकू नये. नाहीतर नस बंधी करायला लागेल ! @rautsanjay61
मुंबईतील दहिसर परिसरातील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडून हत्या केली. त्यांनतर त्याने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. यावरून सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे.