मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nazia Ilahi on Waqf Board) सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिवक्ता नाझिया इलाही यांनी मध्य प्रदेश दौऱ्यादरम्यान वक्फ बोर्डला भूमाफिया म्हटल्यामुळे त्याचबरोबर मोहम्मद जीनांना मानणाऱ्यांनी सरळ पाकिस्ताना जावे, अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे धर्मांधांचा चांगलाच संताप उडाला आहे. खांडवा येथे दहशतवादाविरोधात आणि शूर शहीदांच्या स्मरणार्थ निघालेल्या मशाल मोर्चादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
हे वाचलंत का? : 'यूपी कॉलेज'वर वक्फचा दावा; संत समाजाची तीव्र प्रतिक्रिया-ओवैसींवर हल्लाबोल!
नाझिया इलाही यावेळी म्हणाल्या, "वक्फ बोर्ड हा भूमाफिया आहे. वक्फ बोर्डाचे नाव कुराणात किंवा भारतीय संविधानात लिहिलेले नाही, त्यामुळे वक्फ बोर्ड पूर्णतः मिटवला पाहिजे. तसेच, देशभरात सुरू असलेल्या स्पिट जिहाद, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहादचा संपूर्ण कार्यक्रम उघड करणे आवश्यक आहे." दरम्यान तेलंगणाचे भाजप नेते टी राजा यांनीसुद्धा हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराबाबत उपस्थितांना संबोधित केले.