चितगावच्या लोकनाथ मंदिरावर इस्लामिक कट्टरपंथींचा हल्ला!

    29-Nov-2024
Total Views | 57

Loknath Mandir Chitgaon

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Loknath Mandir Chitgaon News) मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील बांगलादेश सरकारमध्ये हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. एकीकडे इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेची बातमी ताजी असाताना दुसरीकडे चटगावच्या एका मंदिरावर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले आहे. चितगावच्या लोकनाथ मंदिरावर इस्लामिक कट्टरतावादी जमावाने हा हल्ला केला आहे.

हे वाचलंत का? : "तू सामान लेकर आ..."; संभळ हिंसाचाराची धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल!

इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी संबंधित घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कट्टरपंथी रस्त्यावर लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन मंदिरावर दगडफेक करताना स्पष्टपणे दिसत आहे. राधारमण दास यांनी चिन्मय कृष्ण दास यांची अटक आणि कट्टरतावाद्यांकडून होत असलेल्या हिंसाचारावरही टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसह अन्य जागतिक नेत्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी दि. २२ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील उत्तर मागुरा येथील प्रसिद्ध काली मंदिरावर इस्लामिक कट्टरपंथीयांनी हल्ला केला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121