भाजपच्या योगेश सागर यांचा चारकोप मधून सलग चौथ्यांदा विजय!

    23-Nov-2024
Total Views |

charkop
 
मुंबई: (Charkop Vidhansabha Election Result 2024) भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चारकोप विधानसभा मतदारसंघातून योगेश सागर यांचा ९१ हजार १५४ मतांच्या फरकाने सलग चौथ्यांदा विजय झाला आहे. गेल्या १५ वर्षे ते या मतदारसंघाचे आमदार आहेत. यावेळीस जनतेने पुन्हा एकदा विजयाचा कौल त्यांच्या बाजूने दिला आहे.
 
उत्तर मुंबई चारकोप विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार योगेश सागर आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या यशवंत जयप्रकाश सिंग यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) दिनेश साळवी यांना उमेदवारी दिली होती.
 
योगेश सागर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६४,३६७ मतांनी आणि २०१९ च्या निवडणुकीत ७३,७४९ मतांनी विजय मिळवला होता. २००९ पासून ते २०१९ पर्यंतच्या विधानसभा निवडणुकींमध्ये योगेश सागर या मतदारसंघात अजिंक्य राहिले आहेत.
 
भाजपचा चारकोप हा मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो. या मतदारसंघात गुजरातीबहुल भाग जास्त असल्याने भाजपला ही जागा आजमितीस प्रत्येक निवडणुकीत जिंकण्यात यश आले आहे. या चारकोप मतदारसंघात ३०% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन, २०% उत्तर भारतीय, ३५% गुजराती समुदायाचे मतदार आहेत.