मुंबई : हरियाणा सरकारने धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र येथे गीतेच्या १८ अध्यायांवर आधारित १८ भव्य द्वार बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांची आवड वाढविण्यासाठी गीता अभ्यास, ध्यान आणि संशोधन केंद्र देखील बांधले जाणार आहे. कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या नुकत्याच झालेल्या ८२ व्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
नवीन योजनेनुसार, सध्या पिपली गीता द्वार आणि सन्निहित सरोवर सूर्यद्वार बांधण्यात आले आहेत. राज्यपालांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी कुरुक्षेत्र विकास मंडळाला सर्व दरवाजे बांधण्याच्या योजनेचा मसुदा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हे दरवाजे जिथे बांधले जातील त्या ठिकाणांचीही नोंद केली जाईल. या ठिकाणी पेहोवा रोड ज्योतीसर, कुरुक्षेत्र-कैथल रोड, झांसा रोड आणि सेक्टर-3 बायपासचा समावेश आहे.
अशी माहिती आहे की, अष्टकोशी परिक्रमेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारने सूचना दिल्या आहेत. अष्टकोशी परिक्रमा कुरुक्षेत्राच्या बाहेरील भागात असलेल्या प्राचीन नाभी कमल मंदिरापासून सुरू होते. आता परिक्रमा मार्गाचे नूतनीकरण केले जाईल, त्याचबरोबर भाविकांच्या राहण्यासाठी निवारा आणि पिण्याच्या पाण्यासह इतर व्यवस्था केल्या जातील.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक