वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांची आघाडी कायम!

    23-Nov-2024
Total Views | 54
 
Ashish Shelar
 
मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आशिष शेलार आघाडीवर असून त्यांनी २ हजार २१२ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे आसिफ झकेरिया मैदानात होते. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, महायूती १७३ जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी १०१ जागांवर पिछाडीवर आहे.
 
हे वाचलंत का? -  माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर! काय घडतंय?
 
शनिवारी सकाळी ८ वाजतापासून विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, वांद्रे पश्चिममध्ये आशिष शेलारांना आतापर्यंत ४ हजार ५६३ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या आसिफ झकेरिया हे २ हजार ४५१ मते घेत पिछाडीवर आहे. महायूतीमध्ये सध्या भाजपने सर्वात जास्त म्हणजेच १०३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिवसेना ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेस ३० जागांवर आघाडीवर आहे. 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121