सारंगीचे सुर हरपले! पद्मविभूषण पंडित राम नारायण यांचं निधन

    11-Nov-2024
Total Views | 28

pandit ram naaryan 
 
मुंबई : जागतिक कीर्तीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण (९७) यांचे शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास निधन झाले. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा आणि नातू असा परिवार आहे.
 
२५ डिसेंबर १९२७ रोजी उदयपूर, राजस्थान येथे जन्म झालेल्या पंडित राम नारायण यांनी सारंगीला एक प्रतिष्ठित एकल वाद्य म्हणून जगभर प्रसिद्धीस आणले होते. त्यांच्या सादरीकरणांनी जगभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जागतिक मंचांवर सारंगी आणि भारतीय अभिजात संगीताला लोकप्रियता मिळवून देण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले. संगीत क्षेत्रातील अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. २००५ ते पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी ठरले होते.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121